Sunday, May 19, 2024

‘गदर 2’च्या प्रॉडक्शन हाऊसबाबत अमीषा पटेलचा मोठा खुलासा, केले ‘हे’ गंभीर आरोप

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या आगामी ‘गदर 2‘ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाआहे. ज्यानंतर चाहते ‘गदर 2’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित काही धक्कादायक बातम्या समोर आली आहे.

या चित्रपटात सकीनाची भूमिका करणारी अभिनेत्री अमिषा पटेलने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने एक ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने ट्विट करताना लिहिले की, “चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या प्रॉडक्शन हाऊसने हाताळली होती. परंतु प्रॉडक्शन हाऊसने मेकअप आर्टिस्टपासून कॉस्च्युम डिझायनर्सपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही.”

तसेच तिने पुढे लिहिले की, ‘पगाराव्यतिरिक्त शूटिंगदरम्यान झालेल्या खर्चाचे पैसे आणि फ्लाइट तिकिटांचे बिल देखील दिलेले नाहीत. शुटिंगसाठी आलेले अनेक लोक होते, ज्यांच्यासाठी गाडी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते वाटेतच अडकले होते. त्यानंतर सर्व अडचणी पाहून झी स्टुडिओने याप्रकरणी कारवाई करत सर्वांचे पैसे भरले होते. तिने ट्विटच्या माध्यमातून अभिनेत्रीने शारिक पटेल, नीरज जोशी, कबीर घोष आणि निशित यांचेही आभार मानले आहेत.

दरम्यान, या चित्रपटातील ‘उड जा काले कावा’ हे पहिले गाणे रिलीज झाल आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर 2’चे हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. गाण्यामधील सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या खूप वेगळा दिसत आहे. थोड्या प्रमाणात निर्मात्यांनी त्यांना जुन्या लूकमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. (Ameesha Patel made a shocking revelation about the movie ‘Gadar 2’)

अधिक वाचा- 
दहा वर्षात एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही रिया चक्रवर्ती, सुशांत व्यतिरिक्त ‘या’ वादातही अडकलीय अभिनेत्री
‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ फेम अभिनेत्रीने अचानक सोडली चित्रपटसृष्टी, जाणून घ्या काय करतेय सध्या?

हे देखील वाचा