बॉलीवूड सेलिब्रिटी पार्ट्या, इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्ये त्यांची उपस्थिती खास आणि पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडतात. त्यांच्या आउटफिट्स आणि फॅशन सेन्सचे कायमच कौतुक हाेते. काल म्हणजेच रविवारी (दि. 7मे)ला मुंबईत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळा पार पडला. या इव्हेंटमध्ये अनेक स्टार्स सहभागी झाले होते आणि त्यांनी या इव्हेंटमध्ये आपला उत्कृष्ट लूक सादर केला. यात जान्हवी कपूर, अनन्या पांडे, श्रिया सरन, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पण सर्वाधिक लक्ष वेधले ते अनन्या पांडेने. कार्यक्रमात ती खुपच सुंदर दिसत होती, परंतु तिच्याहुन जास्त तिच्या पर्सने सर्वांचे लक्ष वेधले.
अनन्या पांडे (ananya pandey) तिच्या लूक आणि सौंदर्यापेक्षा तिच्या पर्समुळे चर्चेत हाेती. अशात या कार्यक्रमातून अनन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा आउटफिट घातल्याचे दिसून येते. यासोबत तिने गोल्डन कलरची पर्स घेतली आहे, ज्यासाठी सर्व तिचे खिल्ली उडवत आहे.
खरे तर, अनन्या पांडेची पर्स बादलीसारखी आहे. अनन्याच्या हातात अशी पर्स पाहून खुद्द पॅपराझीनेच अभिनेत्रीला गंमतीत विचारले, ‘ती बादलीसारखी दिसत आहे. ती पर्स आहे की बादली?’ अशात बाकीचे पॅपराझीही हसत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. यावर अनन्याही हसते आणि ‘बादली’ म्हणत पुढे निघून जाते.
View this post on Instagram
या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “ते ठीक आहे, पण त्यात काय ठेवणार??”, तर काही युजर्सने तिच्या पर्सची तुलना तिच्या संघर्शाइतकी करत आहेत.
अनन्या पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे.(bollywood actress ananya pandey troll for too small purse netizens asked is this balti or wallet)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“लाळ घोटेपणा करत मराठी अभिनेत्री करीनाच्या मागे धावत गेली पण…” मराठी दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
माेठी बातमी! प्रसिद्ध गायिकेचा भीषण कार अपघात, अनुभव सांगत म्हणाली, “माझे संपूर्ण आयुष्य…”