Tuesday, April 28, 2026
Home बॉलीवूड ‘क्या खूब लगती हो!’ रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा निखळ आनंद देणारा व्हिडिओ तर जरूर बघायला पाहिजे

‘क्या खूब लगती हो!’ रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा निखळ आनंद देणारा व्हिडिओ तर जरूर बघायला पाहिजे

जर आपण बॉलिवूडमधील गोंडस जोडीबद्दल बोललो, तर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे नाव येणार नाही असे कसे काय होऊ शकते. रितेश आणि जेनेलिया त्यांच्या मजेदार व्हिडिओसाठी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच, गुढी पाडवा उत्सवाच्या निमित्ताने दोघांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश आणि जेनेलिया दोघे मेकअप करत आहेत. पण रितेश त्याच्या बायकोला अगदी खास प्रकारे चिडवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कठीण वेळात अंतरआत्म्याला ओलावू नका. या वर्षाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ घालवणे आणि त्याला खास बनवण्याचे मार्ग शोधण्याबद्दल हे आहे. गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.” या व्हिडिओमध्ये रितेश पत्नी जेनेलियासाठी ‘क्या खूब लगती हो’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. गाण्यावर एक्सप्रेशन्स देत दोघेही लिप्सिंग करत आहेत.

 

रितेशने यापूर्वीही एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात पती-पत्नी दोघेही मजेदार अभिनय करताना दिसले होते. गमतीदार रील शेअर करण्यासोबतच अभिनेत्याने आणखी एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याव्यतिरिक्त आजकाल रितेश देशमुख आयपीएल टीम मुंबई इंडियनला पाठिंबा देताना दिसत आहे.

हे देखील वाचा