टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ही अर्चना मानव देशमुख या नावाने घराघरात प्रसिद्ध आहे. तिने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता‘ शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिल्याच मालिकेने तिला रातोरात स्टार बनवले. अंकिताची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. अंकिताने 2019 मध्ये ‘मणिकर्णिका‘ या बॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, त्यानंतर तिला कोणत्याही हिंदी चित्रपटाची ऑफर आली नाही. याविषयी खुद्द एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले आहे.
अंकिता लोखंडे (ankita lokhande) हिने मणिकर्णिका या चित्रपटात कंगना रनाैतसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली होती. तिचा अभिनय लोकांना खूप आवडला, पण ही भूमिका तिच्या गळ्यातील फास ठरली. खरं तर, अंकिताला या चित्रपटानंतर पुन्हा अशा कोणत्याही भूमिकेची ऑफर मिळाली नाही, ज्यामध्ये तिला तलवार उचलण्याची संधी मिळेल. माध्यमातील वृत्तांनुसार, अंकिताने सांगितले की, “माझा गॉडफादर नाही. मी टॅलेंटेड आहे, पण नाही म्हणण्यासाठी माझ्याकडे चित्रपट तर यायला हवी.”
ती पुढे म्हणाली की, “मार्केट खूप वेगळे आहे आणि लोक म्हणतात की, त्यांना चांगल्या ऑफर्स मिळत नाहीत, पण असे माझ्या बाबतीत काहीही झाले नाही. माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर आलेली नाही, जी मी नाकारू शकेन आणि मी कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही.”
View this post on Instagram
2009 मध्ये प्रसारित झालेल्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिता लोखंडेला यश मिळाले. या शोमध्ये तिची जोडी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. सुशांतसोबतची तिची प्रेमकहाणीही याच शोपासून सुरू झाली. मात्र, काही वर्षांनी दोघांचे ब्रेकअप झाले. पवित्र रिश्ताचा सिक्वेल 2022 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये शाहीर शेखने अंकिता लोखंडेसोबत मानवची भूमिका साकारली होती.(bollywood actress ankita lokhande opens up on not getting work post film manikarnika)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’
‘नाचू किती’ गाण्यावर थिरकली नेहा पेंडसे, व्हिडिओ व्हायरल










