Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

विराट कोहलीने अनुष्कासोबत जिममध्ये केला डान्स; पाय माेडताच क्रिकेटरने केली आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे बॉलिवूडमधील सर्वात लाेकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची फॅन फॉलोइंगही खूप जबरदस्त आहे. यासाेबतच दाेघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ते खास फोटो आणि व्हिडिओ कायमच शेअर करतात. अशातच आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या खास व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. अनुष्का शर्माने पती विराटसोबत धमाकेदार डान्स केला आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट क्रिकेटच्या दुनियेत, तर अनुष्का ग्लॅमरच्या दुनियेत आपले कौशल्य दाखवत आहे. दोघेही खूप व्यस्त आहेत, परंतु त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून एकमेकांसोबत मजा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात विराट-अनुष्काच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये दोघेही जिममध्ये पंजाबी बीट्सवर नाचताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का त्यांचा एक पाय हातात धरून एकमेकांना डान्स चॅलेंज करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी या जाेडप्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी विराटला इथेही ट्रोल केले आहे. केशिशा शर्मा नावाच्या युजरने कमेंट करत लिहिले की, “जर त्याने पाय लवकर उचलले असते, तर किमान ताे 0 वर आऊट झाला नसता.” तर काहींनी विराटला आरामात डान्स करण्याचा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

खरंतर चाहत्यांनी अनुष्का – विराटला असा डान्स करू नये अशी विनंती केली आहे. कारण, सध्या आयपीएल सुरू आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळायचा आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.(bollywood actress anushka sharma virat kohli groove to punjabi song in gym)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ प्रसिद्ध काॅमेडियन पुन्हा हसविणार प्रेक्षकांना, पुनरागमन झाले निश्चित

‘या’ लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकाचे किडनी निकामी झाल्यामुळे दुःखद निधन

हे देखील वाचा