Saturday, July 27, 2024

‘या’ लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकाचे किडनी निकामी झाल्यामुळे दुःखद निधन

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड मनोरंजनविश्वातील अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या टपोरी सत्याचे दुःखद निधन झाले आहे. मीडियामधील माहितीनुसार वयाच्या ४५ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. टपोरी सत्याचे निधन झाल्यामुळे त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार मोठ्या धक्क्यात आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या टपोरी सत्याच्या मागे पत्नी, आई आणि तीन मुली असा परिवार आहे.

कन्नड अभिनेता असलेल्या टपोरी सत्याने ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्याला ‘नंदा लव नंदिता’मध्ये एंटागोनिस्टच्या रूपात पाहिले गेले होते. २००८ साली आलेला हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमात नंदिता आणि योगेश मुख्य भूमिकेत होते. टपोरी सत्य बहुतकरून सहायक भूमिकांमध्ये चित्रपटांमध्ये दिसला. त्याच्या कामाचे आणि अभिनयाचे नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक झाले. त्याने दिग्दर्शनात देखील पदार्पण केले होते. ‘मेला’ नावाच्या सिनेमाचे दिग्दर्शन टपोरी सत्याने केले होते. त्यानंतर तो अजून एक सिनेमा दिग्दर्शित करणार होता. मात्र दुर्दैवाने त्याआधीच त्याचे निधन झाले. त्याचे पार्थिव शरीर सध्या बनशान येथे असलेल्या त्याच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

सत्याची आई असलेल्या रुकम्माने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “सत्या मागील एक आठवड्यापासून रुग्णालयात आयसीयूमध्ये होता. त्याचे नेहमीच चित्रपटांबद्दल समर्पण दिसून आले. सत्याने वाचन दिले होते की, तो माझी आणि कुटुंबाची काळजी घेईल. घरात तो एकटाच कमवणारा होता.” सत्याच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे फॅन्स, इंडस्ट्रीला आणि त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

हे देखील वाचा