Tuesday, April 23, 2024

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ प्रसिद्ध काॅमेडियन पुन्हा हसविणार प्रेक्षकांना, पुनरागमन झाले निश्चित

प्रेक्षकांना पाेटधरून हसवण्यासाठी ओळखला जाणारा ‘द कपिल शर्मा शो‘ गेल्या अनेक वर्षांपासून छाेट्या पडद्यावर राज्य करत आहे. गेल्या काही वर्षांत या शोमध्ये अशी काही पात्रं पाहायला मिळाली होती, ज्यांच्याशिवाय या शोची कल्पनाही करता येत नाही. ‘डॉ मशूर गुलाटी’मधलं सुनील ग्रोव्हरचं पात्र असो, किंवा ‘बंपर’मधलं किकू शारदाचं पात्र असो. ‘द कपिल शर्मा शो’ ने नेहमीच नवनवीन पद्धतीने लोकांचे मनोरंजन केले आहे.

‘सपना’ बनून सेलिब्रिटींचे मनोरंजन करणारा कृष्णा अभिषेक यापुढे ‘द कपिल शर्मा शो’चा भाग नसल्याची बातमी अलीकडेच आली होती. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, अशातच माध्यमाशी झालेल्या संभाषणात कृष्णा अभिषेकने ताे शोमध्ये परत येत असल्याची पुष्टी केली आहे.

‘द कपिल शर्मा शो’चे निर्माते आणि कृष्णा अभिषेक यांच्यात काही पैशाची समस्या असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण आता सर्व काही ठीक झाले आहे. माध्यमाशी संवाद साधताना कृष्णा म्हणाला की, ‘करारातील पैशांबाबत काही समस्या होती, जी आता दूर झाली आहे. हा कार्यक्रम आणि चॅनल कुटुंबासारखे आहे आणि मला इथे परत आल्याने आनंद होत आहे.’

कृष्णा अभिषेकने पुढे सांगितले की, ‘सपनाची ग्रँड एन्ट्री आगामी शोमध्ये दाखवण्यात येणार आहे’, ज्याप्रकारे, ”घर का भूला शाम को घर पर लौट कर आए तो उसको भूला नहीं कहते” येथे देखील असेच काहीसे आहे. चॅनल आणि शोच्या निर्मात्यांशी माझे दीर्घकाळ संबंध आहेत. हे नातं इतकं निर्मळ आहे की, मी परत आलो. मी त्या लोकांचाही आभारी आहे ज्यांनी निर्मात्यांना मला परत आणण्यास सांगितले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णा अभिषेकने आगामी शोचे शूटिंग सुरू केले आहे. त्याने सांगितले की, ‘किकू शारदाने सेटवर जाताच त्याला मिठी मारली. कपिललाही तो परत आल्याने आनंद झाला आणि त्याने त्याचे मनापासून स्वागत केले.'(tv comedian krushna abhishek to be back in the kapil sharma show says all issues have been resolved )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

हे देखील वाचा