Tuesday, May 21, 2024

राहुल शर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांवर असिनने साेडले मौन, ‘गजनी’ अभिनेत्रीने पोस्ट करून सांगितले सत्य

अभिनेत्री असिन हिने साऊथासाेबतच बाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. आमिर खान स्टारर ‘गजनी‘ मधील कल्पना शेट्टीची भूमिका साकारून आसिन खूप प्रसिद्ध झाली. अशात गेल्या काही दिवसांपासून असिनचे पती राहुलसोबतचे नात बिनसल्याच्या अफवा चर्चेत हाेत्या. खरे तर, अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले होते, ज्यानंतर असिनचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली होती. अशात आता असीनने या सर्व अफवांवर मौन साेडले असून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सत्य सांगितले आहे.

असिन (asin thottumkal) हिने बुधवारी (28 जुन)ला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट करून घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. अभिनेत्रीने लिहिले की, ‘ती सध्या राहुलसोबत तिच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहे.’ तिने पती राहुलपासून घटस्फोटाच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आणि त्या ‘अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे बेसलेस’ असल्याचा दावा केला.

असिनने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या मध्येच, अक्षरशः एकमेकांच्या बाजूला बसून नाश्त्याचा आनंद लुटत असताना काही अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे बेसलेस ‘बातम्या’ आल्या. मला त्या दिवसांची आठवण आली, जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबासह घरी बसलो होतो आणि आमच्या लग्नाच्या तयारी करत हाेताे. अशात अशी बातमी आली की, आमचे ब्रेकअप झाले आहे. खरच?! कृपया चांगले काही करा. (या निराशेवर एक सुंदर सुट्टीतील 5 मिनिटे वाया घालवले!) तुमचा दिवस चांगला जावो.”

asin thottumkal
Photo Courtesy: Instagram/simply.asin

असिनचा नवरा राहुल मायक्रोमॅक्सचा सह-संस्थापक आहे. अभिनेत्रीने 2016मध्ये राहुलसोबत लग्न केले आणि लग्ननंतर तिच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णपणे निरोप दिला. 2017मध्ये राहुल आणि असीनने त्यांची मुलगी अरिनचे स्वागत केले.

असिन तामिळ आणि तेलुगू चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. असिनने 2001 मध्ये ‘नरेंद्रन माकन जयकांथन वाका’ या मल्याळम चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2008 मध्ये आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर असिनने ‘रेडी’, ‘हाऊसफुल 2’, ‘बोल बच्चन’ आणि ‘खिलाडी 786’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. तिचा शेवटचा चित्रपट ‘ऑल इज वेल’ 2015 मध्ये रिलीज झाला होता.(bollywood actress asin thottumkal broke silence on rumours of divorce with husband rahul sharma write we are enjoying summer vacation )

अधिक वाचा-
करणने ‘तुम क्या मिली’ हे गाणे ‘गुरू’ यश चोप्रा यांना केले समर्पित, ‘या’ कारणामुळे मागितली आलियाची माफी
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा