Tuesday, May 28, 2024

असिनने इन्स्टावरुन पती राहुल शर्मासोबतचे फाेटाे केले डिलीट, ‘गजनी’ अभिनेत्रीचे लग्न मोडणार ?

अभिनेत्री असिन थोट्टूमकल हिने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले होते. असिनने 2001 साली मल्याळम चित्रपट ‘नरेंद्रन माकन जयकांथन वाका’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि लवकरच ती दक्षिण चित्रपटांची सुपरस्टार बनली. यानंतर असिनने आमिर खानपासून सलमान खानपर्यंत अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आणि तिचे चित्रपट खूप हिट ठरले.

मात्र, लग्नानंतर असिन (asin thottumkal) अभिनयापासून दुरावली. अशात असिन पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली असताना, अभिनेत्री आणि तिचा पती राहुल यांच्यात काहीही तरी बिनसलं असल्याचे समाेर येत आहे. याचे कारण म्हणजे असिनने पतीसोबतचे तिचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत.

असिनने मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केले होते. सेटल झाल्यानंतर असिनने फिल्म इंडस्ट्री सोडली. अशात आता अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबतचे सर्व फोटो हटवल्यामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या लग्नाची फाेटाे देखील डिलीट केले आहेत, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना ती घटस्फोट घेणार आहे का? असा प्रश्न पडला आहे. असिनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आता तिची 5 वर्षांची मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फाेटाे आहेत.

असिनने दिवंगत ऋषी कपूर यांच्या निधनानंतर भावनिक पोस्टमध्ये पती राहुलसोबतचा एकच फोटो ठेवला आहे. हा मोनोक्रोम फाेटाे असीन आणि राहुलच्या लग्नाच्या रिसेप्शनचा आहे, ज्यात ज्येष्ठ अभिनेते देखील उपस्थित होते. दुसरीकडे, असिन आणि राहुलच्या एका फॅन पेजने असा दावा केला आहे की, असिनने फेब्रुवारीमध्येच राहुलसोबतचे तिचे फोटो काढून टाकले होते. पेजच्या अॅडमिनने या जोडप्याचे काही फोटो शेअर केले आणि काही काळापासून असीन तिच्या पोस्ट कशा अपलोड आणि डिलीट करत आहे याकडे लक्ष वेधले.

मात्र, असिन आणि तिचा पती राहुल यांच्यात सर्व काही ठीक आहे की, नाही याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. असीनने राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो का डिलीट केले आणि तिच्या इन्स्टाग्रामवरील विचित्र वागण्यामागचे कारण काय आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. (bollywood actress asin thottumkal deleted her pictures with husband rahul sharma from insta sparks divorce rumours )

अधिक वाचा-
ब्लाइंड टीझर: सीरियल किलरच्या शोधात निघाली सोनम कपूर, 4 वर्षांनंतर परतणार रुपेरी पडद्यावर
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा