सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर पोहोचली. या पार्टीत भूमीचा लूक खूपच बोल्ड आणि स्टायलिश होता, पण भूमीच्या एंट्रीपेक्षाही तिची या पार्टीतून बाहेर पडल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण की, रविवारी (दि. 12 फेब्रुवारी)ला पार्टीनंतर भूमी कॅमेऱ्यांसमोर एका मिस्ट्री मॅनला किस करताना दिसली.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका मिस्ट्री मॅनसोबत पार्टी सोडून तिच्या कारकडे जात आहे. भूमी गाडीजवळ पोहोचताच तिचा ‘खास मित्र’ तिला गाडीत बसवतो. दरम्यान, सिक्योरिटी गार्ड वारंवार मीडियाच्या कॅमेऱ्यांना कव्हरेज करण्यापासून रोखताना दिसत आहेत. मात्र, त्यानंतर हा मिस्ट्री मॅन कारमध्ये बसून भूमीला किस करताना दिसताे. आता या व्हिडिओवर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि प्रत्येकजण पुन्हा पुन्हा विचारत आहे की, ‘त्याने भूमीला किस केले का?’
हा व्हिडिओ पॅपराझींनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला हाेता. मात्र, आता पॅपराझींने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून हटवला आहे.

पाहिले गेले तर, बॉलीवूड स्टार्स त्यांचे नाते खूप सीक्रेट ठेवतात आणि जेव्हा त्यांना हवे तेव्हाच त्यांच्या नात्याचा खुलासा करतात. मात्र, भररात्री भूमीला किस करणार हा मिस्ट्री मॅन कोण? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या रिसेप्शन पार्टीत भूमी पेडणेकर गोल्डन कलरच्या साडीत दिसली. मात्र, तिने ज्या पद्धतीने ही साडी नेसली त्यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत होती.
भूमीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच कियारा अडवाणीसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसली होती. यानंतर भूमी लवकरच दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘भिड’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचा ‘अफवाह’, गौरी खान प्रॉडक्शनचा ‘भक्त’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये भूमी दिसणार आहे.( bollywood actress bhumi pednekar spotted kissing mystery man after attending sidharth malhotra kiara advani reception video goes viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व किंजवडेकरने श्रेया डफळापुरकरसोबत उरकला साखरपुडा
नट्टापट्टा केलेली ‘ही’ छाेटी मुलगी आहे तरी काेण? आजकाल ‘किस’ व्हिडिओमुळे आहे चर्चेत










