Wednesday, March 29, 2023

नट्टापट्टा केलेली ‘ही’ छाेटी मुलगी आहे तरी काेण? आजकाल ‘किस’ व्हिडिओमुळे आहे चर्चेत

मनोरंजन विश्वात असे अनेक चेहरे आहेत ज्यांचा ग्लॅमरस लूक चर्चेचा विषय असताे. अशीच एक अभिनेत्री आहे जी जेव्हाही तिचा एखादा ग्लॅमरस फोटो शेअर करते तेव्हा ती माेठ्या प्रमाणात व्हायरल होते. या अभिनेत्रीची बालपणीची स्टाइल पाहून तुम्हाला हे समजले असेल की, आताच नाही तर लहानपणापासूनच या अभिनेत्रीची स्टाइल खास आहे.

फोटोत दिसणार्‍या गोंडस मुलीचे डोळे पाहून तुम्ही या सुंदर अभिनेत्रीला ओळखले असेल. नसेल ओळखले तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही छाेटीशी मुलगी अभिनेत्री भूमी पेडणेकर (bhumi pednekar) आहे. भूमीचा जन्म 18 जुलै 1989 रोजी मुंबईत झाला. लहानपणापासूनच भूमीला सुंदर कपडे घालण्याची आणि स्टाईलने राहण्याची आवड होती.

सुरुवातीच्या शिक्षणानंतर भूमीने यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. चित्रपटांमध्ये असिस्ट करण्यासोबतच ती नवीन चेहऱ्यांनाही कास्ट करायची. दरम्यान, भूमीला यशराज प्रॉडक्शनकडून ‘दम लगा के हईशा’ चित्रपटासाठी प्रस्ताव आला. आयुष्मान खुरानाची पत्नी ‘संध्या’ या भूमिकेसाठी भूमीने 15 किलो वजन वाढवले होते. तर, चित्रपटादरम्यान तिचे वजन 80 किलोपर्यंत गेले. या चित्रपटामुळे गोलू मोलू भूमीने सर्व प्रेक्षकांच्या ह्रद्यात स्थान निर्माण केले होते.

मात्र, चित्रपटासाठी भूमीने तिचे वजन वाढवले ​​होते. अशा परिस्थितीत चित्रपटानंतर वजन कमी करणे हे तिच्यासाठी मोठे टास्क होते. त्यासाठी भूमीने अहोरात्र मेहनत घेतली आणि आहार, व्यायामाच्या माध्यमातून तिने तिचे बॉडी शेपमध्ये आणली.

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या, भूमीचे काही फोटो साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनला किस करताना दिसत आहे. भूमीचे हे फोटो कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाच्या रिसेप्शननंतरचे आहेत.(bollywood actress bhumi pednekar started career as casting director her transformation from )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा