बोल्ड लूकमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा!! पाहा भूमी पेडणेकरचे ‘हे’ खास फोटोशूट


अभिनेत्री भूमी पेडणेकरने ‘दम लगा के हैशा’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने ‘संध्या’ची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेमुळे तिचे खूप कौतुकही झाले. या भूमिकेतल्या दमदार अभिनयामुळे भूमीने फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पदार्पणाचा पुरस्कार आपल्या नावावर केला. भूमीने संध्याची भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच भूमी पेडणेकर स्वत: ला ग्लॅमरस लूकमध्ये साचण्याचा प्रयत्न करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूमीने स्वतः हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रेक्षकांना भूमीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळला. भूमीच्या फॅशन स्टेटमेंटवर नजर टाकली तर असे दिसून येते की टाइमलेस दिसण्यासाठी ती प्रत्येक शक्य तितके प्रयत्न करते.

भूमीने एकदा माध्यमांना सांगितले होते की, तिला नेहमी अशा चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, ज्यामध्ये ती नवीन लूकसह नवीन प्रयोग करू शकेल. बर्‍याचदा भूमीची फॅशनबद्दलची आवड प्रेक्षकांना पाहायला मिळते.

भूमी पेडणेकर बोल्ड फोटोशूट करण्यासाठीही कधी मागे हटत नाही. बाथ टबमधील या फोटोने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. या अभिनेत्रीने ‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘सांड की आँख’ यासारख्या चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

या फोटोत भूमी अप्रतिम दिसत आहे. जमिनीवर झोपून काढलेला हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचवेळी दुसऱ्या फोटोत ऑफ व्हाईट कलरच्या लॉग शर्टमध्ये भूमीचे सौंदर्य दिसून येत आहे. भूमीने हलका मेक-अप, खुले केस आणि हातात एक घड्याळ घातलेली आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भूमी पेडणेकर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसते.


Leave A Reply

Your email address will not be published.