Thursday, April 18, 2024

क्रॉप टॉपवर शाल! दिशा पटानीच्या शॉर्ट ड्रेसवर युजर्स संतापले, ट्राेल करत म्हणाले…

दिशा पटानी ही बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. यासोबतच दिशा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते.  दिशा पटानी तिच्या परफेक्ट फिगर आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अशात अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे आणि बाेल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरे तर, नुकतीच दिशा पटानी (disha patani ) वाराणसीला पोहोचली होती. जिथे ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली. सध्या दिशा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला पोहोचली आहे. यादरम्यान ती मंदिर आणि गंगा आरतीमध्ये सहभागी झाली होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा पटानी गंगा आरतीच्या वेळी क्रॉप टॉपमध्ये दिसली. यासोबत तिने त्यावर शाल पांघरली हाेती आणि टॉपसोबत जीन्स घातला हाेता. व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या हातात आरतीचे ताट आहे आणि ती या वेस्टर्न पोशाखात गंगा आरती करत आहे, जी लोकांना अजिबात आवडत नाही.

व्हिडिओशिवाय अभिनेत्रीचे मंदिरातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर युजर्स जोरदार कमेंट करत अभिनेत्रीला ट्राेल करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘जेव्हा पू पार्वती झाली.’, तर दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘मला माहित आहे की, ते वाईट आहे पण मला आशा होती की ती असे काहीतरी घालेल जे तिने तिथे घालू नये.’ त्याचसाेबत एका यूजरने लिहिले की, ‘तिने क्रॉप टॉप घातला आहे का?’ अभिनेत्रीच्या या लूकमुळे लोकांना खूप राग आला आहे. दिशाचे मंदिरात आणि गंगा आरतीच्या वेळी क्रॉप टॉप घालणे लोकांना अजिबात आवडली नाही, त्यामुळे साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या पाेस्टवर भिन्नभिन्न कमेंट करून तिला ट्राेल करत आहेत.(bollywood actress disha patani in varanasi visit in mandir and doing ganga aarti users troll her badly video photos viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“…एकदा गमावल्यानंतर पुन्हा…” रोनित रॉयने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर स्मृती इराणींनी कमेंट करत विचारले…

शैलेश लोढा यांनी ‘या’ कारणासाठी केली तारक मेहता…च्या निर्मात्यांविरोधात केस दाखल

हे देखील वाचा