Sunday, December 3, 2023

एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…,’

अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ त्याच्या अॅक्शन, मार्शल आर्ट आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने बॉलिवूडमध्ये ‘हिरोपंती’ ह्या चित्रपटातुन पदार्पण केले. त्या चित्रपटात त्याने ‘बबलु’ ही भुमिका साकारली होती. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तसेच टायगर त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतो. अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. दोघांचे ब्रेकअप झाले. असे असले तरी दिशाने टायगरच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

दिशाने (disha patani) टायगरचा (tiger shroff), एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटो मध्ये टायगरने ब्लॅक जॅकेटवर वाघाचे पट्टे असतात, त्यासारखी एक टोपी घातली आहे. दिशाने त्यावर “Happy B’day tiggy, stay beautiful and inspiring” म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छा, असाच सुंदर आणि प्रेरणादायी राहा, असे तिने तो फोटो शेअर करत लिहिले आहे. त्याबरोबरच तिने पिंक हार्ट ईमोजी पोस्ट केले आहेत.

Tiger Shroff
Photo Courtesy: instagram/dishapatani

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी त्यांच्या नात्यावर कधीच उघडपणे बोलले नाही, बऱ्याचवेळा कार्यक्रमात दोघेही एकत्र दिसत होते. 2022 मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. तेव्हापासून दोघेही एकत्र दिसत नाहीत, पण आज टायगरच्या वाढदिवसानिमित्त दिशाने त्याच्यासाठी पोस्ट केली आहे. (bollywood actress disha patani share instagram photo for actor tiger shroff birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! शाहरुख खानची पत्नी ‘गौरी खान’ यांची अडचण वाढणार….लखनऊमध्ये FIR दाखल, नेमक काय आहे प्रकरण?
टायगर श्रॉफला करायचे आहे हॉलिवूडमध्ये काम, म्हणाला मी’ अनेकवेळा ऑडिशन दिलेत पण…’

हे देखील वाचा