Saturday, June 29, 2024

‘ये जवानी है दिवानी’मधील ‘लारा’ दुस-यांदा बनली आई, पोस्ट शेअर करून दिले नव्या बाळाची अपडेट

ये जवानी है दिवानी‘मध्ये ‘लारा‘ची भूमिका साकारणारी एव्हलिन शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. ही गोड बातमी स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत एव्हलिनने सांगितले की, तिने एका मुलाला जन्म दिला आहे. याआधी एव्हलिनला एक मुलगी आहे.

एव्हलिन (evelyn sharma) हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या मुलाचा चेहरा लपलेला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मुलाला जन्म दिल्यानंतर मी जे अनुभवले ते मी कधीच अनुभवले नव्हते… माझ्या लहान मुलगा आर्डेनला हाय म्हणा…’

गेल्या वर्षी एव्हलिनने मुलीला जन्म दिला होता. तिच्या मुलीचे नाव अवा आहे. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 14 महिन्यांतच या अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिने तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली होती. इतकंच नाही, तर एव्हलिनने तिच्या बेबी बंपचे फोटोही शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

एव्हलिनने अनेक हिंदी चित्रपटात केले काम
एव्हलिन शर्मा ही एक जर्मन मॉडेल असून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘ये जवानी है दिवानी’मध्ये दिसली. याशिवाय तिने ‘नौटंकी साला’, ‘यारियां’, ‘मैं तेरा हीरो’, ‘कुछ कुछ लोचा है’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

विशेष म्हणजे, एव्हलिन शर्माने 15 मे 2021 रोजी ऑस्ट्रेलियात तिचा प्रियकर तुषान भिंडीसोबत लग्न केले. तिचा पती डेंटल सर्जन आहेत. दोघे 2018 सालापासून मित्र होते आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघांनी लग्न केले.( bollywood actress evelyn sharma gave birth to son share instagram post told child name )

अधिक वाचा-
HAPPY BIRTHDAY | ​​’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे ​​माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट
‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च हाेण्यापूर्वी नयनताराचा लूक झाला लीक? साेशल मीडियावर उडाली खळबळ

हे देखील वाचा