Monday, March 4, 2024

रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये केली 15 वर्षे पूर्ण, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी जिंकली चाहत्यांची मने

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता रणबीर कपूर याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये लीड हिरो म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या 15 वर्षांच्या कारकिर्दीत रणबीर 30 हून अधिक व्यक्तिरेखा साकारून आज बॉलिवूडचा रॉकस्टार बनला आहे.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये रणबीर (Ranbir Kapoor) याने 2022 मध्ये दोन मोठे चित्रपट देऊन चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांचा भरभरुण प्रतिसाद मिळाला. एक म्हणजे  ‘शमशेरा’ तर दुसरा ‘ब्रह्मास्त्र: भाग 1’ शिवा ज्यामध्ये तो त्याची पत्नी आलिया भट्ट (Aliya Bhatt) हिच्यासोबत दिसला होता. नुकताच हा चित्रपट OTT वर देखील प्रदर्शित झाला आहे.

यापूर्वी रणबीरने 2009 मध्ये ‘वेक अप सिड’मध्ये काम केले होते, या चित्रपटात त्याने कॉलेजचा तिरस्कार करणाऱ्या आळशी, निष्काळजी किशोरवयीन मुलाची भूमिका साकारली होती, त्यानंतर रणबीर ‘ये जवानी है दिवानी’मध्ये दिसला हाेता.या चित्रपटातील बनीच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांना वेड लावले होते.

आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी रणबीरने नेहमीच सिद्ध केले आहे की, त्याच्यामध्ये अभिनय कौशल्याची कमतरता नाही. रणबीरने आपल्या पात्रांनी चाहत्यांची मनं जिंकून आज बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या रोमँटिक नायकाच्या प्रतिमेच्या पलीकडे, त्याने 2010 मध्ये ‘राजनीती’ सारख्या चित्रपटात काम केले जे त्याच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. या चित्रपटात समर प्रतापची भूमिका साकारून रणबीरने बरीच प्रशंसा मिळवली. रणबीरने आपल्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. जे कौतुकास्पद आहे. त्यांनी ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’, ‘बर्फी’,’जग्गा जासूस’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.

रणबीर कपूरची आणखी एक गोष्ट आहे जी त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. आजच्या युगात जेव्हा प्रत्येक सामान्य व्यक्ती सोशल मीडिया वापरताे अशावेळी रणबीर कपूर सर्व प्लॅटफॉर्मपासून दूर आहे. एवढेच नाही तर रणबीर हा एकमेव अभिनेता आहे ज्याला सर्व प्रकारची भूमिका करायला आवडते. अभिनेता म्हणून 15 वर्षांच्या कारकिर्दीत रणबीरने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. चाहत्यांची मने जिंकून तो आजही बॉलिवूडचा रॉकस्टार आहे. (bollywood actor ranbir kapoor completes 15 years in bollywood as an actor won the hearts of fans like this with different characters)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलियाची स्टाईल देश-विदेशातही हिट; मॉडेल्सने गंगूबाई लूकमध्ये केलं रॅम्पवॉक

सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता प्रवास करूनही हर्षवर्धन मिळवू शकला नाही लोकप्रियता, वडिलांसोबत दिसण्याची चर्चा

हे देखील वाचा