Thursday, April 18, 2024

समंथाचा हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते झाले हैराण, जाणून घ्या काय आहे ‘या’ फोटो मागचे सत्य

साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शकुंतलम‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पडद्यावर फारशी कमाई केली नसली तरी समंथाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशात अभिनेत्री सतत तिचे एकामागून एक फोटो शेअर करताना दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणुन घेऊया…

अभिनेत्रीने एकूण 10 पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती 16 वर्षांची दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तिचे दोन कुत्रे दिसत आहेत. अशात तिसर्‍या फोटोमध्ये अभिनेत्री ऑक्सिजन मास्कसह हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे की, नेमके अभिनेत्रीला काय झाले, पण घाबरण्यासारखे काही नाही. तिने काही अविस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. तिचा हा फोटो ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान काढला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

याशिवाय, अभिनेत्री एका फोटोमध्ये घोड्यावर स्वार होताना देखील दिसत आहे आणि नंतर तिने तिच्या जाहिरात शूटचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्रीने जिममधला एक फोटोही शेअर केला आहे आणि अखेर  रवींद्रनाथ टागोरांच्या फोटोसह ही पोस्ट संपवली, ज्यात लिहिले होते, ‘आपल्याला ज्या झाडाची सावली लाभणार नाही हे माहित असूनही, जे व्यक्ती ते झाड लावतात, त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ समजला आहे.’ या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, “जसे मी पाहू शकते.”

समंथाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘शकुंतलम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकलेला नाही. या चित्रपटानंतर आता अभिनेत्री तिच्या आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’मुळे खूप चर्चेत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. यात समंथा अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती तेलुगु रोमँटिक चित्रपट ‘खुशी’मध्येही दिसणार आहे.(bollywood actress fans are shocked to see samantha ruth prabhu hospital photo)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखाडी ब्लेझरमध्ये आलिया भट्टचा हटके फाेटाेशूट, फाेटाे व्हायरल

जिया खान प्रकरणी ‘या’ दिवशी येणार अंतिम निकाल, 10 वर्षानंतर अभिनेत्रीला मिळणार न्याय?

हे देखील वाचा