Thursday, April 18, 2024

जिया खान प्रकरणी ‘या’ दिवशी येणार अंतिम निकाल, 10 वर्षानंतर अभिनेत्रीला मिळणार न्याय?

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. जियाच्या आत्म’हत्येनंतर तिच्या घरातून सहा पानाची सुसाईड नोट सापडली हाेती, जी जियाने लिहिलेली हाेती. तिच्या म्हणण्यानुसार, तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याने तिला आत्म’हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणी 20 एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. अशात आता उद्या म्हणजेच 28 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता विशेष सीबीआय न्यायालय जिया खान प्रकरणावर अंतिम निकाल देणार आहे.

दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांनीही याप्रकरणी सूरज पांचोली यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर, सूरज पांचोलीला 10 जून 2013 रोजी अटक करण्यात आली आणि दोन आठवड्यांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर जुलै 2014मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे गेले. जियाच्या आईनेही ही आत्म’हत्या नसून हत्या असल्याचे सांगितले होते. यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी फेटाळून लावली होती.

नुकतेच जिया खानच्या आईने सीबीआय कोर्टात निवेदन दिले होते, त्यात त्यांनी सांगितले की, “सूरज जियावर शारिरीक आणि मानसिक अत्याचार करत असे. पोलीस आणि सीबीआय या दोघांनीही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत”, असेही त्या म्हणाल्या.

‘निशब्द’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशात उद्या, 28 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता विशेष सीबीआय न्यायालय 10 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देणार आहे.(bollywood actress jiah khan suicide case special cbi court will pass the final verdict against sooraj pancholi on 28 april)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा