Sunday, April 14, 2024

व्हायरल फोटोंनंतर गेहना वशिष्ठने फैजानसोबत लग्न न झाल्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडचे नाव..’

गंदी‘ बात फेम गेहना वशिष्ठ काही दिवसांपुर्वी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. गेहना वशिष्ठने फैजान अन्सारीसोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचे वृत्त होते. अशात तिच्या लग्नाचे फाेटाे आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले हाेते. मात्र, आता त्यांचे लग्न खोटे असल्याची बातमी समोर आली आहे. गेहना वशिष्ठने कधीही लग्न न केल्याचा खुलासा केला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

गेहना (gehna vasisht) हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या लग्नाशी संबंधित सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पाेस्टद्वारे सांगितले की, “मी कधीही कोणाशीही लग्न केलेले नाही. हे फक्त वेब सिरीजचे शूट होते, त्याशिवाय काही नाही. मी हेही स्पष्ट करते की, मी फैजानला फारसे ओळखत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

गेहना पुढे म्हणाली, ‘शूटसाठी फैजानसोबत माझी ही दुसरी भेट होती आणि आम्ही तिसर्‍यांदा त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो. खरे सांगायचे, तर मला त्याचे पूर्ण नावही माहित नाही. ताे कुठे असताे काय त्याच्याबाबतीतही मला काहीच माहीत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

गेहनाने तिच्या पोस्टमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचे नाव देखील उघड केले आणि म्हटले की, ‘माझा अनेक दिवसांपासून बॉयफ्रेंड आहे आणि त्याचे नाव राम आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्याशी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. विशेषत: अशा व्यक्तीशी ज्याला मी ओळखतही नाही. गेहनाच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स तिला तिचा पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत, तर काहींना गेहनाच्या लग्नाची काळजी वाटत आहे.(bollywood actress gehna vasisht refused to marry with faizan ansari said my boyfriend name is ram)

अधिक वाचा:
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत
Death Anniversary: ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा 150 वर्षे जगण्याची इच्छा असणारा मायकल; 12 डॉक्टर्स रोज करायचे तपासणी

हे देखील वाचा