Monday, June 24, 2024

इंजेक्शन घेऊन तरुण झाली हंसिका? अभिनेत्रीने स्वतः सांगितला करिअरचा प्रवास

आपल्या अभिनयाने टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बाॅलिवूडपर्यंत लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, प्रियकराशी लग्नबंधनात अडकलेली हंसिका कधी तिच्या हनीमूनसाठी, तर कधी तिच्या नवीन शोमुळे चर्चेत असते. पण आज हंसिका प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं कारण म्हणजे तिच्यावर अनेक दिवसांपासून होत असलेला आरोप आहे. हंसिकावर अनेकदा कथितपणे ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन घेऊन मोठी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नुकतीच हंसिका आणि तिची आई मोना मोटवानी यांनी त्यांच्यावरील या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘शका लाका बूम बूम’ मध्ये संजूच्या व्यक्तिरेखेने घराघरात पाेहचलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी (hansika motwani) हिने सर्वांचे खूप मनोरंजन केले आहे. टीव्ही मालिकानंतर ‘कोई मिल गया’मध्ये हृतिक रोशनसोबत काम करून प्रसिद्धी मिळवणारी हंसिका हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरुर’मध्ये अचानक मोठी झालेली दिसली. 2007मध्ये अचानक दिसण्यात बदल झाल्यामुळे हंसिकाला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यादरम्यान हंसिकाच्या आईने तिच्या मुलीला लवकर वाढवण्यासाठी ग्रोथ हार्मोन्सचे इंजेक्शन दिल्याची चर्चा होती.

हंसिका आणि तिची आई आजपर्यंत या सर्व आरोपांवर मौन बाळगून होत्या, पण अलीकडेच अभिनेत्रीचा शो ‘ हंसिका लव्ह शादी ड्रामा’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोघीही याबाबत मोकळेपणाने बोल्या. अभिनेत्रीने ती वेळ सांगितली जेव्हा अफवा पसरल्या होत्या की, तिच्या आईने तिला हार्मोनचे इंजेक्शन दिले होते.

तिची आई मोना मोटवानीशी बोलताना हंसिका म्हणाली, “सेलिब्रेटी असण्याचा हा सगळा दंड आहे. मी 21 वर्षांची असताना मीडियाने असे मूर्खपणाचे लिखाण केले, मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला माहिती आहे… जर मी अशा प्रकारचा मूर्खपणाला तेव्हा झेलू शकते तर मी आजही झेलू शकते. या वेळी लोकांनी सांगितले की, माझ्या आईने मला मोठी मुलगी होण्यासाठी इंजेक्शन, हार्मोनल इंजेक्शन दिले.”

हंसिका नंतर तिच्या आई म्हणाली, “जर हे खरे असेल, तर मी टाटा, बिर्ला, करोडपती यांच्यापेक्षा श्रीमंत असायला हवे. जर हे खरे असते तर मी म्हणाले असते, मी माझ्या मुलीला हे दिले आहे, तुम्हीही या, आणि तुमचे हाड मोठे करा. मला आश्चर्य वाटते की, अशा गोष्टी लिहिणाऱ्यांना मेंदू नसतो का? आम्ही पंजाबी लोक आहोत, आमच्या मुली 12 ते 16 या वयोगटात शूट करतात.” हे सर्व सांगत असताना मोना मोटवानींच्या चेहऱ्यावर त्या लोकांबद्दलचा राग स्पष्टच दिसत होता.

हंसिकाचा शो ‘हंसिका लव्ह शादी ड्रामा’ दर शुक्रवारी डिज्नी+हॉटस्टारवर प्रसारित होतो.(bollywood actress hansika motwani reacts to rumours about alleged use of hormone injections to grow up )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : आधी प्रेग्नेंट मग लग्न! स्वरा भास्करच्या बेबी बंपचे फोटो झाले व्हायरल, नक्की काय आहे प्रकरण?

राखी सावंतचा प्रेग्नेंसी अन् मिसकॅरेजवर धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऑपरेशननंतर आदिलने माझ्यासोबत…’

हे देखील वाचा