Sunday, May 19, 2024

मुस्लिमांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या प्रश्नावर अखेर हुमाने दिले सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘भारतात राहत असताना मला…’

हुमा कुरेशी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली आहे. हुमा अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर‘मधून चांगलीच चर्चेत आली. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतरही ती अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. अशात सध्या हुमा तिच्या ‘तरला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यातही हुमाचा अभिनय प्रेक्षकांना पसंत पडत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान हुमा कुरेशीला विचारण्यात आले की, ‘बॉलिवूडमध्ये मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातो का?’ तर अभिनेत्रीने यावर चोख उत्तर दिले. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

हुमा कुरेशी (huma qureshi) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी हुमाने इंडस्ट्रीमध्ये धर्माबाबत भेदभावाबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. खरे तर, हुमाला विचारण्यात आले की, ‘पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांच्यासमाेर अमेरिकन मीडियाने त्यांना भारतातील मुस्लिमांच्या अधिकारांबद्दल विचारले होते.’ या घटनेवर प्रतिक्रिया देताना हुमा म्हणाली, ‘भारतात राहत असताना मला कधीच वाटले नाही की, ‘अरे! मी मुस्लिम आहे, मी वेगळी आहे. माझे वडील गेल्या 50 वर्षांपासून ‘सलीम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत आहेत. व्यक्तिशः मला असे कधीच वाटले नाही, परंतु काही लोकांना असे वाटू शकते. मला वाटते प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रत्येक सरकारने उत्तरेही दिली पाहिजेत.

 

इस पोस्ट को इंस्टाग्राम पर देखें

 

हुमा क़ुरैशी (@iamhumaq) द्वारा साझा की गई एक पोस्ट

हुमा कुरेशीचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, ‘या पृथ्वीवर जिवंत असलेल्या कोणत्याही माणसासाठी भारत सर्वात सुरक्षित आहे.’, तर दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘हुमाजींनी योग्य उत्तर दिले.’

हुमाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर तिचा अलीकडेच ‘तरला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांचा बायोपिक आहे. (bollywood actress huma qureshi talked on muslim polarization in bollywood said i never felt i am muslim and i am different)

अधिक वाचा-
कपूर खानदानचा ‘तो’ नियम मोडन्यासाथी नईन याना लागली होती 26 साल, 21 वर्ष वयात थटलेला संसार

अमिताभ बच्चन यानी ट्रेलर्सबाबत व्यक्ित केलं मत; म्हाले, ‘अता लोक मला गरीब और निर्बुद्ध…’

हे देखील वाचा