Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड मास्टर शेफने हुमा कुरेशीला किस करण्यापूर्वी केले ‘हे’ काम, व्हिडिओ झाला व्हायरल

मास्टर शेफने हुमा कुरेशीला किस करण्यापूर्वी केले ‘हे’ काम, व्हिडिओ झाला व्हायरल

हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खूप प्रसिजद्धी मिळवली आहे. तिने अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले. हुमा कुरेशीने 2012 मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. सध्या तिचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी लवकरच ‘डबल एक्सएल’नंतर आगामी ‘तरला’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक बायोपिक आहे, ज्यामध्ये ती हुमा तरला दलालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

नुकताच ‘तरला’ (Tarla) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यानंतर अभिनेत्री हुमा कुरेशीराची (Huma Qureshi) चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून प्रशंसना केली जात आहे. दरम्यान, हुमा कुरेशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती माजी न्यायाधीश आणि मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचे होस्ट शेफ गॅरी मेहिगनसोबत दिसत आहे.

हुमा आणि शेफ गॅरीचा हा व्हिडिओ अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटचा आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरी तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. शेफ गॅरी मेहिगन देखील या कार्यक्रमात पोहोचला होता, जिथे त्याने आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला. यावेळी शेफ गॅरी यांनी हुमाला किस करण्यापुर्वी तिची परवानगी मागतात.

ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ हुमा कुरेशीला भेटतात. त्यावेळी विचारतात की, “मी तुम्हाला किस करू शकतो का?” शेफच्या प्रश्नाला हुमाने नम्रपणे “होय” असे उत्तर देते. शेफ तिच्या गालावर किस करतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी शेफ गॅरीचे कौतुक करण्यास सुरूवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 दरम्यान, हुमा कुरेशी ‘तरला’ चित्रपटात प्रसिद्ध शेफ तरला दलालच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरेशी तिच्या ‘तरला’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Actress Huma Qureshi Kissed By Australian Master Chef Video Goes Viral)

अधिक वाचा-
‘इंटिमेट सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?’ प्रिया बापटच मोठ भाष्य, “उमेशपेक्षा…”
धक्कादायक! जगप्रसिद्ध गायिकेचे 48 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा