Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

इलियाना डिक्रूझने प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर शेअर केला बॉयफ्रेंडचा फाेटाे, ‘बेबीमून’ एन्जॉय करताना दिसली अभिनेत्री

बाॅलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ प्रेग्नेंट आहे. या सगळ्यात अभिनेत्रीने तिच्या प्रियकराचा एक फाेटाे साेशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी इलियाना डिक्रूजच्या हातात एंगेजमेंट रिंगही पाहायला मिळत आहे. काेण आहे ताे लकी चॅम्प? चला, जाणून घेऊया…

इलियाना डिक्रूज (ileana dcruz) हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. अशात असा अंदाज लावला जात आहे की, फोटोमध्ये दिसणारा हात अभिनेत्रीच्या प्रियकराचा आहे आणि हे त्यांच्या डिनर डेटचे फोटो आहेत. फोटो शेअर करताना इलियाना डिक्रूझने इंस्टाग्रामवर लिहिले की, “राेमान्सची माझी कल्पना त्यांना शांततेत जेवू देत नाही.”

फोटोमध्ये इलियाना डिक्रूझच्या हातात हिऱ्याची अंगठी असून ती प्रियकराचा हात हातात धरून आहे. मात्र, अभिनेत्रीने हा फाेटाे ब्लॅक अँड व्हाइटमध्ये शेअर केला आहे.

Photo Courtesy: Instagram/ileana_official

इलियाना डिक्रूझने एप्रिलमध्ये ती प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. मात्र, तेव्हापासून अभिनेत्रीने तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव उघड केले नाही. तिच्या न जन्मलेल्या मुलाचे वडील कोण आहेत, याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

प्रग्नेंट झाल्यापासून इलियाना डिक्रूझ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय आहे. विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजी अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर करून ती प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीने तिच्या बेबी बंपचे अनेक फोटोही साेशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (bollywood actress ileana dcruz shares the first picture of her boyfriend actress is enjoying babymoon see viral pictures )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती

महाभारत फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा