शहनाज गिल तिच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सतत कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शहनाज जान्हवी कपूरसोबत बसलेली दिसत आहे. मात्र, तिचे चाहते या व्हिडिओबद्दल संतापले आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
शहनाज गिल (shehnaaz gil) हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका अवॉर्ड शोमधील आहे. या कार्यक्रमात पूजा हेगडे, जान्हवी कपूर आणि शहनाज गिल एकत्र बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर पूजा हेगडेसोबत बोलताना दिसत आहे. यादरम्यान शहनाज दोघांमध्ये बसून त्यांचे बोलणे ऐकत आहे.
View this post on Instagram
अशात अभिनेत्रींच्या संभाषनादरम्यानचा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दावा केला की, जान्हवी कपूरने शहनाजकडे दुर्लक्ष केले आणि अभिनेत्रीच्या याच कृत्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले की, ‘जान्हवी शहनाजकडे का दुर्लक्ष करतेय?’, तर आणखी एका चाहत्याने म्हणटले की, “जान्हवी शहनाजकडे दुर्लक्ष करते आणि शहनाज पूजाकडे दुर्लक्ष करते, ही एक टॉक्सिक इंडस्ट्री आहे.”
अशात सोशल मीडियावर जान्हवी कपूरच्या ट्रोलिंगवर तिचे चाहतेही समर्थनार्थ पुढे आले. एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, “कुणीही कुणाकडे दुलर्क्ष करत नाही आहे. उगाच ट्राेल केले जात आहे.”, तर आणखी एका चाहत्याने सांगितले की, “सनाकडे अजिबात दुर्लक्ष केले जात नाही, फक्त जान्हवीला ट्रोल करत आहे.”
‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि शहनाज गिल व्यतिरिक्त पूजा हेगडे, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे.( bollywood actress janhvi kapoor brutally trolled for ignoring kisi ka bhai kisi ki jaan actress shehnaaz gil)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यावर मराठी अभिनेत्रीने ओढले ताशेरे म्हणाली, ‘मुजोरी तर राजवाड्यातल्या…’
सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, जाणून घ्या विश्वसुंदरी आणि अभिषेकची प्रेमकहाणी