Monday, March 4, 2024

सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, जाणून घ्या विश्वसुंदरी आणि अभिषेकची प्रेमकहाणी

ऐश्वर्या राय बच्चन ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर देशातच नाही, तर परदेशातही खूप नाव कमावले आहे. आजही जगाच्या कानाकोपऱ्यात तिचे चाहते आहेत. सौंदर्य आणि अभिनयासोबतच, बच्चन कुटुंबाची सून म्हणूनही ऐश्वर्याचे एक वेगळे स्थान आहे.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर, ऐश्वर्या राय ‘बच्चन’ बनली. आजही बऱ्याच चाहत्यांना माहिती नाही की, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मने कशी जुळली आणि ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून कशी झाली. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून बनण्यामागील कहाणी सांगणार आहोत…

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या दिवसांमध्ये ऐश्वर्या आणि सलमान खानच्या प्रेमकथेची बरीच चर्चा असायची. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले जाऊ लागले आणि नंतर ऐश्वर्याने विवेकसोबतही ब्रेकअप केले.

दुसरीकडे, ऐश्वर्यापूर्वी अभिषेक बच्चनने कपूर घराण्याची मुलगी करिश्मा कपूरसोबत साखरपुडा केला होता. मात्र काही कारणांमुळे या दोघांचेही ब्रेकअप झाले. ‘ढाई अक्षर प्रेम के’ दरम्यान झालेल्या ऐश्वर्या अभिषेकच्या मैत्रीचा पुढचा टप्पा ‘उमराव जान’मधून पुढे सरकला. 2006 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली.

ऐश्वर्या राय बच्चनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, अभिषेक बच्चनने अगदी रोमँटिक पद्धतीने तिला प्रपोज केले होते. त्याने टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नकली अंगठी घालून ऐश्वर्याला प्रपोज केले होते. त्यानंतर 2007 साली हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यानंतर ती बच्चन कुटुंबाची सून बनली आणि तिने अमिताभ बच्चन यांच्या आलिशान बंगल्यात पाऊल ठेवले. लग्नाच्या 4 वर्षानंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला, जीची काळजी घेण्यात ती कोणतीही कसर सोडत नाही. आज ऐश्वर्या आणि अभिषेक प्रत्येक प्रसंगी त्यांची मुलगी आराध्याची काळजी घेताना दिसतात.(love-story-aishwarya-roy with-abhishek-bachchan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा