Wednesday, June 26, 2024

अभिनेत्री काजोलने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; म्हणाली, “मला भीती वाटते आणि…”

बॉलिवूडमधील अतिशय उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे काजोल देवगण होय. काजल म्हणजे नुसता सळसळता उत्साहच होय. ती नेहमीच चित्रपटांसोबतच विविध कार्यक्रमांना दिसते. काजोलने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिशय कमी वयात तिने मोठे यश मिळवले आहे. काजोल मागील अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसत नाही. तिने ब्रेक घेतला आहे.

काजोलने (Kajol Devgan) इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर तिच्यात मोठा फरक पडला आहे. काजोल सोशल मीडिायावर सक्रिय असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. काजोलने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आला आहे.

काजोल सध्या तिच्या आगामी ‘द ट्रायल’ या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. सध्या ती मालिकेच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. व्हिडिओमध्ये काजोल म्हणाली की, ‘हे सांगणे सोपे नाही, पण मी कामाच्या शोधात आहे. मला भीती आणि चिंता वाटत आहे. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना मुलांसाठी आणि कुटुंबासाठी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. पण आज परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मला पुन्हा माझ्या करिअरला सुरुवात करावी लागली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

काजोल पुढे बोलताना म्हणाली की, “मी खोटे बोलत नाही. पण मला भीती वाटते. मी नाराज आहे. मला पुन्हा सर्व काही सुरू करावे लागणार आहे. माझ्या मनात अनेक शंका आहेत. मी नव्या पिढीशी स्पर्धा करू शकेन का? पण मी ब्रेकवर होते याचा अर्थ मी सक्षम आहे, असं अजिबात नाही. नवीन आत्मविश्वासाने मी माझ्या कामात सुधारणा करेन.” काजोल या व्हिडिओमध्ये तिच्या फिल्मी करिअर आणि पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसत आहे.(bollywood Actress kajol surprised again with promotional video lust stories actress says took break from career for family now wants to comeback details)

अधिक वाचा-  
‘साउथ दिल्ली का टैटू आर्टिस्ट…’ आदिपुरुष फेम मेघनाद चर्चेत, लूकवरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदाच एकत्र झळकणार, पाहा फोटो 

हे देखील वाचा