Monday, April 15, 2024

‘साउथ दिल्ली का टैटू आर्टिस्ट…’ आदिपुरुष फेम मेघनाद चर्चेत, लूकवरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘टारझन- द वंडर कार’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात अभिनेता वत्सल सेठ जबरदस्त कामगिरी केली आहे. वत्सल सेठने ‘टारझन– द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेता वत्सल सेठ लहानपणापासूनच चित्रपट आणि टीव्हीवर सक्रिय आहे. त्याने २००४ मध्ये या चित्रपटाद्वारे बॉलिवूड विश्वात पदार्पण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आयशा टाकिया दिसली होती. आता वत्सल सेठ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच आला आहे. जाणून घेऊया ते कारण.

नुकताच 16 जूनला प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष‘ चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटावर सममिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या चित्रपटाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या चित्रपटातील पात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या चिपटात अभिनेता वत्सल सेठने (vatsal sheth) मेघनादची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही. अनेक प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर यूजर्स आदिपुरुषच्या मेघनादच्या लुकची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. मेघनादला नेटकऱ्यांनी ‘साउथ दिल्ली का टैटू आर्टिस्ट…’ म्हटले आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या जोरात चर्चेत आहे. पण, हा चित्रपट चांगल्या कारणांमुळे नाही तर चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, चित्रपटातील पात्रे आणि त्यांचे लूक सध्या खूप चर्चेत आहेत.

वत्सल सेठ विषयी सांगायचे झाले तर, ‘टारझन’ नंतर वत्सल ‘नन्हे जैसलमेर’, ‘हीरोज’ आणि ‘हॉस्टल’सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. या चित्रपटांतील वत्सलच्या कामाचे खूप कौतुक झाले. 2013मध्ये तो पुन्हा एकदा टीव्हीकडे वळला. 2013मध्ये तो ‘झलक दिखला जा’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये दिसला होता. टीव्हीवर त्याने ‘एक हसीना थी’ या प्रोजेक्टद्वारे कमबॅक केला. त्याने पुढे ‘रिश्तों का सौदागर – बाजीगर’, ‘हासिल’ आणि ‘कौन है’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. (bollywood adipurush fame meghnad indrajeet trolled for look users calls actor vatsal sheth south delhi ka tottoo artist detail about actor)

अधिक वाचा- 
बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदाचा एकत्र झळकणार, पाहा फोटो
ऐंशी दशकात राज बब्बर यांनी पहिल्यांदा केले होते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचे धाडस । जन्मदिन विशेष 

हे देखील वाचा