Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदाच एकत्र झळकणार, पाहा फोटो

बाप चोर, मुलगी पोलीस.. सैफ आणि सारा बापलेक पहिल्यांदाच एकत्र झळकणार, पाहा फोटो

अभिनेत्री सारा अली खान हि प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. तिने चित्रपट सृष्टीत चांगले काम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. साराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सैफ अली खान आणि साराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बाप-लेक एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर सारा आणि सैफ अली खानचा (Saif Ali Khan) एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमुळे सारा आणि सैफ अली खान चर्चेत आले आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सारा (Sara) पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर सैफ अली खान कैद्याच्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो पाहुन लोकांची उत्सुकता वाढली आहे.

असा कोणता प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये या बाप-लेकीची जोडी दिसणार आहे, हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. त्याच वेळी सैफ आणि सारा फिल्मसिटीमध्ये शूटिंग करताना दिसत आहेत, तेव्हा इब्राहिम अली खानही तिथे उपस्थित होता. त्यामुळे या अगामी प्रोजेक्टमध्ये इब्राहिमही झळकणार का? याची उत्सुकता लोकांना लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सैफ अली खान विषयी बोलायच झाल तर, सैफ अली खान नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसला आहे. त्या चित्रपटात त्याने साकरलेल्या त्याच्या भूमिकेवरून सैफला प्रचंड ट्रोल केले गेले. त्याची स्टाइल लोकांना अजिबात आवडली नाही. दुसरीकडे सारा विषयी बोलाचं झाल तर, ती विकी कौशलसोबत ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात झळकली. सारा लवकरच ‘मेट्रो इन दिनों’ ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ए वतन मेरे वतन जैसी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.(Actor Saif Ali Khan and Sara Baplek will be seen together for the first time)

अधिक वाचा- 
ऐंशी दशकात राज बब्बर यांनी पहिल्यांदा केले होते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचे धाडस । जन्मदिन विशेष
‘नेहरू एक बिग भूल’पासून ‘मी-टू’पर्यंत या विधानांनी मुकेश खन्ना यांच्या आयुष्यात उडवली होती खळबळ । mukesh khanna birthday

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा