Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी माझ्या शरीराचा तिरस्कार करू लागले होते’, अभिनेत्री कल्कि कोचलीनने केला गरोदरपणातील अनुभव शेअर

आई होणं ही जगातील सर्वात सुखकारक गोष्ट आहे. मातृत्व स्त्रीला पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. निसर्गाने ही भाग्याची गोष्ट फक्त स्त्रीला प्रदान केली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी एका जीवाला जन्म देताना त्या स्त्रीला काय यातना होतात याकडे मात्र सगळेच कानाडोळा करतात. स्त्रीकडे प्रजनानाची शक्ती निसर्गानेच बहाल केली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढी ताकद असतेच हे सगळेजण गृहीत धरतात. पण या दरम्यान होणारा त्रास हा असह्य असतो. सामान्य स्त्रिया या गोष्टी सहन करतात. पण यामागील मानसिक आणि शारीरिक त्रास काय असतो याबद्दल अभिनेत्री कल्कि कोचलीन हीने भाष्य केले आहे.

अभिनेत्री कल्कि कोचलीन ही काही दिवसांपूर्वी आई झाली आहे. गरोदरपणात तिला इतर महिलांप्रमाणेच अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. कल्कि लवकरच तिचे एक पुस्तक लिहिणार आहे. यात ती तिला गरोदरपणात आलेले अनुभव सांगणार आहे.

हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना तिने सांगितले होते की, “अशा खूप कमी महिला आहेत ज्या गरोदरपणात होणाऱ्या त्रासाबद्दल खुलेआम बोलताना दिसतात. त्यामुळे आपण फक्त एवढचं ऐकतो की, तो एक सुखद अनुभव असतो. हो नक्कीच!! आई होणं ही गोष्ट एका स्त्रीसाठी सुखद गोष्ट आहेच, पण त्या दरम्यान अनेक शारीरिक आणि मानसिक परिवर्तनाला सामोरे जावे लागते.”

कल्किने पुढे सांगितले की, “अनेकजण असे म्हणतात की, जर तुम्ही आई होण्याच्या प्रवासाबद्दल वाईट अनुभव सांगितला, तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या बाळावर होतो.”

गरोदरपणातील अनुभव सगळ्यांसोबत शेअर करावा ही कल्पना कल्किला तेव्हा सुचली, जेव्हा सतत उलट्या झाल्याने तिची तब्बेत खूप खराब झाली होती. तिने सांगितले की, “मला असे वाटत होते की, मी अचानक माझी सगळी शक्ती गमावली होती. मला नीट विचार देखील करता येत नव्हता की, काही काम करता येत नव्हते. मी माझ्या शरीराचा तिरस्कार करू लागले होते. मला पूर्ण क्षमतेने कोणतेच काम करता येत नव्हते.”

कल्किने सांगितले की, “बाळाला जन्म दिल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये होते. मला नीट झोप देखील मिळत नव्हती. मला अनेक वेळा एकटी असल्याची भावना येत होती. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे मी कोणाला भेटू शकत नव्हते. त्यामुळे मला माहिती नाही की, ही भावना सामान्य होती की नव्हती.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

हे देखील वाचा