सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

pakistan government sends last notice to owners of dilip kumar and raj kapoors havelis time till may 18


पाकिस्तानच्या किस्सा ख्वानी बाजार पेशावर येथील राज कपूर आणि दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित हवेली बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने औपचारिकरित्या त्यांचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाकिस्तान सरकारने यासाठी कारवाई करण्यासही सुरुवात केली आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सरकारने, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन त्या घरांचे संग्रहालयात रूपांतर होऊ शकेल. यासाठी घरांच्या मालकांना १८ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पाठवली गेली नोटीस
पेशावरचे उपायुक्त खालिद महमूद यांनी बुधवारी (५ मे) या ऐतिहासिक इमारतींच्या सध्याच्या मालकांना अंतिम नोटीस बजावली आणि त्यांना १८ मेला बोलावले आहे. खैबर पख्तूनख्वा सरकारने हवेलींच्या ठरवलेल्या किंमतींवर, मालक आपले आरक्षण सादर करू शकतात. या संदर्भात, प्रांतीय सरकार किंवा कोर्ट, हवेलीच्या किंमती वाढवू शकतात.

किंमतीमुळे नाखुश आहेत मालक
तत्पूर्वी, सरकारने राज कपूर यांच्या ६.२५ मरला हवेलीसाठी आणि दिलीपकुमारांच्या ४ मरला घरांसाठी, १.५० कोटी आणि ८० लाख देऊन, त्यांचे संग्रहालयांमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखली होती. अशा परिस्थितीत, राज कपूरच्या हवेलीचे मालक अली कादिरने या हवेलीसाठी २० कोटींची मागणी केली होती. दुसरीकडेे दिलीप कुमार यांच्या हवेलीचे मालक गुल रेहमान मोहम्मद म्हणाले होते की, सरकारने ते बाजार दरावर खरेदी करावे, म्हणजे जवळपास ३.५० कोटी रुपये.

त्याचबरोबर, खैबर पख्तूनख्वा पुरातत्व आणि संग्रहालये विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समद यांनी सांगितले की, दोन्ही घरे ताब्यात घेतल्यानंतर ईद-उल-फितरनंतर जीर्णोद्धाराचे काम केले जाईल. कपूर हवेली म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर किस्सा ख्वानी बाजारात आहे. प्रसिद्ध अभिनेता यांचे आजोबा दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी, १९१८ ते १९२२ दरम्यान हे घर तयार केले होते. याच इमारतीत राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता. अशा परिस्थितीत, आता याचे संग्रहालय बनविण्याची तयारी सुरू आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे १०० वर्ष जुने वडिलोपार्जित घरही याच भागात आहे. हे घर आता जीर्ण झाले आहे आणि २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारने याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल


Leave A Reply

Your email address will not be published.