Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ती एकटी बॉलिवूडला वाचवत आहे’, कंगनाने केली 52 वर्षीय तब्बूची प्रशंसा

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा ‘दृश्यम 2‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. दरम्यान, कंगना राणौतने तब्बूचे जोरदार कौतुक केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असे अभिनेत्रीने तिचे वर्णन केले आहे. कंगनाने रविवारी (दि. 20 नाेव्हेंबर)ला तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तब्बूचे कौतुक केले. ज्यामुळे कंगना आणि तब्बू चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री कंगना (kangana ranaut) हिने 52 वर्षीय तब्बू (Tabu) हिचे सर्वोत्कृष्ट असण्याबद्दल कौतुक केले. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “यावर्षी फक्त दोनच हिंदी चित्रपटांनी चमत्कार केले आहेत, ‘भूल भुलैया 2’ आणि ‘दृश्यम 2.’ या दोन्ही चित्रपटांमध्ये सुपरस्टार तब्बू जी मुख्य भूमिकेत आहे, जी वयाच्या 50 व्या वर्षी चमत्कार करत आहे आणि ती एकटी हिंदी चित्रपटसृष्टीला वाचवत आहे. तिची प्रतिभा आणि सातत्य यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही, परंतु तिचे चांगले दिसणे आणि पन्नाशीत स्टारडम गाठणे कौतुकास्पद आहे.

कंगना रणौतने तब्बूचे एक प्रेरणा म्हणून वर्णन केले आणि पुढे लिहिले, “मला वाटते की, महिलांना त्यांच्या कामाबद्दलच्या  अतूट समर्पणासाठी खूप श्रेय द्यायला पाहिजे, त्या खराेखरच एक प्रेरणा आहेत.”

kanganaranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

माध्यमातील वृत्तानुसार, ‘दृश्यम 2’ ने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींचा व्यवसाय केला.

यापूर्वी तब्बू ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 185.92 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केले होते.( bollywood actress kangana ranaut called 52 year old tabu a superstar said she is saving bollywood alone)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! ‘बिग बॉस 11’ फेम अर्शी खान अडकणार लग्न बंधनात, मोठ्या बिझनेसमॅनसोबत थाटणार संसार

साऊथच नवीन जाेडपं अडकलं विवाह बंधनात, सोशल मीडियावर अभिनंदनाचा पाऊस

हे देखील वाचा