Tuesday, May 28, 2024

अरे वाह! ‘बिग बॉस 11’ फेम अर्शी खान अडकणार लग्न बंधनात, मोठ्या बिझनेसमॅनसोबत थाटणार संसार

‘बिग बाॅस 11’ फेम अर्शी खान हिने आपल्या विचित्र कृत्येनं आणि सुंदर उर्दूने लाेकांचे लक्ष वेधले. अशातच आता अभिनेत्रीनं पुष्टी केली आहे की, ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. होय, अर्शी खानच्या आयुष्यातही कोणीतरी आलय. मात्र, तो ईशान मसीह नसून दुसरा काेणीतरी आहे. काेण आहे ताे लकी मॅन जाे अर्शी साेबत विवाह बंधनात अडकणार आहे. चला जाणुन घेऊया…

अर्शी खान (arshi khan) हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, “ती इशान मसीहला डेट करत नाहीये. यासोबतच तिचा हाेणारा नवरा मनोरंजन विश्वाशी संबंधित नसल्याचेही तिने सांगितले. मात्र, अर्शी खानने तिच्या होणार्‍या नवऱ्याबद्दल अधिक माहिती शेअर करण्यास नकार दिला, परंतु तो एक व्यापारी असल्याचे तिने सांगिलते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

अर्शी खान तिच्या हाेणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणाली, “तो मनाेरंजन क्षेत्रातील नसून एक व्यापारी आहे. आम्ही एक वर्षानंतर लग्नाचा निर्णय घेतला आहे. मात्र, मला माझे नाते सार्वजनिक करायचे नाही. हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे.”

अर्शी हिने पुढे सांगितले की, “बिग बॉस 14 मध्ये असताना मी ठरवले होते की, आता मी माझे नाते आणि वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवेन, नाही तर लाेक सतत मला जज करत राहतील.” खरं तर, अर्शी खानच्या सागरपुड्याची अफवाह वर्षाच्या सुरुवातील खूप चर्चेत आली हाेती, जेव्हा ती दुबईला गेली हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

मात्र, अर्शी खानने अशा सर्व अफवांना फेटारुन माध्यामाना सांगितले की, “मी माझ्या चित्रपट, वेब शो आणि संगीतासाठी बॅक टू बॅक शूटिंग करत होती. मी बरेच दिवसांनपासून सुट्टीसाठी गेलेली नव्हती, म्हणून रमजानच्या पवित्र महिन्यात दुबईला जाण्याचा मी बेत केला. पण, जेव्हा मला माझ्या एंगेजमेंट विषयी विचारण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले.”

अर्शी खान साेशल मीडियावर सतत सक्रिय असून तिचा इन्साटाग्राम खूप माेठा चाहता वर्ग आहे. जाे तिच्या फाेटाे आणि व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव करताे.(tv bigg boss 11 fame arshi khan to get married her businessman boyfriend soon says he is not from showbiz industry )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मेरी कहानी श्रद्धा वॉकर जैसी’, ‘या’ अभिनेत्रीनं लिव्ह इन रिलेशनशिपवर केला धक्कादायक खुलासा

अर्रर्र! अवॉर्ड्स शाेमध्ये असे काय घडले की, रणवीरची आई लागली रडायला?

हे देखील वाचा