Thursday, April 18, 2024

कंगणाने ‘टिकू वेड्स शेरू’ मधलं पहिलं गाणं केलं रिलीज, अवनीतला रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पाहून चाहते थक्क

टिकू वेड्स शेरू‘ या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या लिपलॉक सीनवरून गदारोळ झाला आहे. मात्र, निर्मात्यांना याची फारशी पर्वा झालेली नसून या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.

कंगना राणौत (kangana ranaut) हिने मंगळवारी (20 जुन)ला ‘टिकू वेड्स शेरू’मधील ‘मेरी जान जान’ या पहिल्या गाण्याचा टीझर शेअर केला. या गाण्यात अवनीत जाेरदार ठुमके लावताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून असा किलर डान्स केला आहे की, हे गाणे काही मिनिटांतच व्हायरल झाले आहे. काही मिनिटांच्या गाण्यात अवनीतने तिची दमदार शैली दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या गाण्यात नवाजुद्दीन कुठेच दिसत नाही, पण अवनीतवरून क्षणभरही नजर हटवणे कठीण जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

हे व्हिडिओ गाणे शेअर करत कंगनाने कॅप्शन लिहिले की, ‘ये है इश्क बन जो हमारे दिल पर चल गया. मेरी जान जानचा ऑडिओ रिलीज झाला आहे.’ या गाण्याचे कॅप्शन जितके सुंदर आहे तितकेच अवनीतचे एक्सप्रेशन्स डेंजर आहेत. अशात एकाने कमेंट करत लिहिले की, ‘एक लहान मुलगी नाचतेय असं दिसतंय.’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘ही मुलगी खूप खराब अभिनेत्री आहे. तुम्हाला चांगली अभिनेत्री सापडली असती.’ अशात एका युजरने व्हिडिओवर कमेंट केली की,  ‘जान्हवी किंवा अनन्याला घेतले असते, तर बरे झाले असते. मला माहित आहे की, ती देखील चांगली अभिनेत्री नाही, परंतु किमान तिने यापेक्षा चांगली कामगिरी केली असती.’

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा ‘टिकू वेड्स शेरू’ 23 जून रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीरने केले आहे, तर निर्मिती कंगना रणाैतने सांभाळली आहे.(bollywood actress kangana ranaut shares nawazuddin siddiqui avneet kaur film tiku weds sheru song meri jaan jaan )

अधिक वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा निर्माता असित मोदीविरोधात एफआयआर दाखल, लवकरच होणार अटक?
पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा