‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर सध्या आपले मातृत्व एन्जॉय करत आहे. तिने नुकतेच आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करीना आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येकाला करीना आपल्या दुसऱ्या मुलाचे काय नाव ठेवणार, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. कारण यापूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दुसऱ्या मुलाच्या नावावर आहेत. अशाच प्रकारे आता करीनाच्या नावाबाबतही एक कहाणी समोर येत आहे.
खरं तर करीना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर, १९८० रोजी मुंबईत झाला होता. त्यावेळी गणपतीची पूजा सुरू होती. करीनाच्या जन्माच्या एक आठवड्यापूर्वी तिचे काका ऋषी कपूर यांच्याही घरात मुलीने जन्म घेतला होता. गणेशोत्सव दरम्यान जन्मलेल्या दोन्हीही नातींचे नाव त्यांचे आजोबा राज कपूर यांनी ठेवले होते. राज कपूर यांनी गणपतीच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्या नावावरून रिद्धिमा आणि सिद्धिमा असे ठेवले होते. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी आपल्या मुलीचे नाव आजही रिद्धिमा असेच ठेवले आहे.
परंतु बबिता आणि रणधीर कपूर यांनी आपली मुलगी सिद्धिमाचे नाव बदलले होते. करीनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये राज कपूरसोबत करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर आणि करीना कपूर आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलेल्या दिसत आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, करीनाची आई बबिता जेव्हा गरोदर होती, तेव्हा लिओ टॉलस्टॉय यांचे ‘Anna Karenina’ हे पुस्तक वाचत होती. या पुस्तकाच्या शीर्षकाचे नाव त्यांनी खूप आवडले होते. बबिताने तेव्हाच ठरवले होते की, त्यांना जर मुलगी झाली, तर ते तिचे नाव करीना ठेवेल. त्यामुळे राज कपूर यांनी ठेवलेले नाव बदलून त्यांनी करीना असे नाव दिले होते.
याव्यतिरिक्त घरात तिला वडील रणधीर कपूर यांनी बेबो असे नाव दिले. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरचे निक नेम ‘लोलो’ असे आहे.
करीना आणि करिश्मा सध्या बॉलिवूडमधील आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिले लग्न सैफला पडले होते भलतेच महागात, घटस्फोटानंतर अमृताला दिले होते ‘इतके’ कोटी रुपये
-रुपेरी पडद्यावर पहिला ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री, जिला भारतीय म्हणायचे पहिली सुपरस्टार
-पेंटर बनण्याची इच्छा असणाऱ्या मुलाने चित्रपटाचे शुटिंग पाहिले, मनं बदललं आणि आज झालाय इंडस्ट्रीतील ‘बाप’ दिग्दर्शक