Monday, March 17, 2025
Home बॉलीवूड श्रीदेवीच्या लेकीने शेअर केला बिकिनीमधील फाेटाे, वाचा बहीण जान्हवी कपूर काय म्हणाली कमेंटमध्ये

श्रीदेवीच्या लेकीने शेअर केला बिकिनीमधील फाेटाे, वाचा बहीण जान्हवी कपूर काय म्हणाली कमेंटमध्ये

चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या धाकट्या मुलीने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. लवकरच खुशीचा चित्रपट ‘आर्चीज‘ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, ज्यासाठी बरीच चर्चाही रंगली आहे. खुशी कपूर ही त्या स्टार किड्सपैकी एक आहे ,जी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. कधी विमानतळावरून तर कधी इंस्टाग्रामवरून खुशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेच, सोशल मीडियावर खुशीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहते बोनी कपूरच्या मुलीवर प्रेमाच वर्षाव करत आहेत. इतकचे नव्हे, तर खुशीची मोठी बहीण जान्हवीही या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

खरं तर, खुशी (khushi kapoor) हिने इंस्टाग्रामवर काही फोटोंचा एक संपूर्ण अल्बम शेअर केला आहे, ज्यामध्ये कुठे ती स्वतः, तर कुठे ती डॉग्ससाेबत पाेज देताना दिसत आहे. मात्र, या संपूर्ण अल्बममध्ये जो फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे खुशीचा बिकिनी फोटो. खुशीने अनेक फोटोंमध्ये तिचा एक बिकिनी फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या आणि गुलाबी बिकिनीमध्ये दिसत आहे. फाेटाेत दिसत आहे की, खुशीने निळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि गुलाबी रंगाचा बॉटम घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. खुशीचा हा फोटो पाहून लोक तिच्या अॅब्स आणि मेंटेन केलेल्या फिगरचे कौतुक करत आहेत.

त्याचबरोबर अभिनेत्रीची बहीण जान्हवी कपूर आणि तिची खास फ्रेंड ओरीने या फोटोवर कमेंट केली आहे. जान्हवीने लिहिले, ‘Prettiest म्हणजे सर्वात सुंदर’, तर ओरीने फोटोवर फ्रेश लिहिले आहे. ‘आर्चीज’ बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात खुशी व्यतिरिक्त शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चनची नात अगत्स नंदा आणि इतर स्टार्स किड्स देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(bollywood actress khushi kapoor share her bikini photo this is how sister janhvi kapoor react )

अधिक वाचा-
“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच
‘नातेवाईकच मुलींसोबत बला’त्कारासारखे घृणास्पद…’, हे काय बाेलून गेली उर्फी जावेद? व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा