Sunday, May 19, 2024

“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे होय. आपल्या अभिनयासोबतच समाजातील होणाऱ्या घडामोडींवर अभिनेत्री केतकी आपले परखड मत व्यक्त करत असते. ती तिच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. सोमवारी (3 जुलै ) सर्वत्र गुरूपौर्णिमा साजरी केली जात आहे. त्याच निमित्ताने केतकीने एक पोस्ट शेअर केली आहे.

‘आंबट गोड’ मालिकेतून घरघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. केतकीला कोणत्याही परिचयाच गरज नाही. केतकीला नेहमी आपल्या परखड वक्तव्यामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. केतकीने पोस्ट शेअर करत तिने गुरूपौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिने पंजीबद्दल आणि आजारपणाबद्दलही एक किस्सा शेअर केला आहे.

केतकीने गुरूपौर्णिमेनिमित्त तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘“गुरू असतात अनेक, गुरू होतात अनेक,गुरू वागतात अनेक; पण मान कमवतात क्वचितच.” तसेत तिने एक टिप लिहिले आहे. त्यामध्ये तिने लिहीले की, “कृपया happy gurupournima नको.” तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. सध्या केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केतकीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “निडर, हातावर त्रिशूळ आणि डोक्यावर कुंकू” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सुरेख लिहिलं आहेस केतकी. गुरू पौर्णिमेलाच नाही पण कुठल्याच आपल्या सणांसाठी हॅप्पी अमुक अमुक मला योग्य वाटत नाही.” तसेच काही नेटकऱ्यांनी तिला गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे.

केतकी विषयी बोलायच झाले, तर तिने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘Mr & Mrs सदाचारी’ मधून केली आहे. केतकाने ‘आंबट गोड’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर एन्ट्री केली. याशिवाय तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. (Ketaki Chitale’s post on the occasion of Gurupurnima is in discussio)

अधिक वाचा- 
अभिनेत्री शिबानी दांडेकरच्या बहिणीने उडवली चाहत्यांची झोप; बिकिनीतील फोटो व्हायरल  
शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य

हे देखील वाचा