हिंदी चित्रपटसृष्टीतील नवीन अभिनेत्रींना सोशल मीडियावर जास्त वेळ घालवायला आवडते, त्यापैकीच एक अभिनेत्री आहे जी अनेकदा तिच्या बालपणीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अलीकडेच हा फोटो प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता, जो आता चर्चेत आहे. फाेटाेत अभिनेत्री तिच्या भावाचा लाड करताना दिसत आहे. काेण आहे अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
फोटोत हसणाऱ्या या मुलीने, 2014 मध्ये ‘फगली’ चित्रपटातून पदार्पण केले. तिच्या कुटुंबाचे बॉलिवूडशी जुने नाते आहे. तिचे खरे नाव आलिया आहे. काही तासांपूर्वी ती प्रियकरासह लग्न बंधनात अडकली आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. तर मंडळी ओळखले तुम्ही काेण आहे ही अभिनेत्री?
हाेय, ही कियारा अडवाणी आहे जी राजस्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण जगत आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा आयुष्यभरासाठी एक झाले आहेत. या जोडप्याच्या लग्नाला चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज पोहोचले आहेत. फोटोमध्ये 30 वर्षीय कियारा अडवाणी तिचा भाऊ मिशाल अडवाणीसोबत दिसत आहे. अभिनेत्रीच्या भावाने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे यासाेबतच तो एक संगीतकार देखील आहे आणि वयाच्या 13 व्या वर्षापासून संगीतसृष्टीत सक्रिय आहे.
View this post on Instagram
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 38 वर्षीय सिद्धार्थ कियारापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. कियाराचे वडील जगदीप एक व्यापारी आहेत, तर आई जेनेविव्ह जाफरी एक शिक्षिका आहेत, ज्यानी कियाराही शाळेत शिकवले. माध्यमातील वृत्तानुसार, आज कियाराची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती सुमारे 3 कोटी रुपये मानधन घेते.(bollywood actress kiara advani childhood photo actress with brother mishaal now married to shershaah film costar sidharth malhotra)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘महाराष्ट्राला देशभर, जगभर पोहचविण्यासाठी…’म्हणत, हिंदीमध्ये शो करण्यावरून ट्रोलर्सला सोनाली कुलकर्णीचे उत्तर
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे