Monday, July 1, 2024

लग्नाच्या मंडपात लाजत नाही, तर नाचत झाली कियाराची एन्ट्री; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या रॉयल वेडिंगमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड किल्ल्यावर या जोडप्याने शाही पद्धतीने लग्न केले. आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही स्टार्स लग्नादरम्यान आनंदी पाहायला मिळत आहे.

कियारा अडवाणी (kiara advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) ​​यांच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओची सुरुवात जयमाला घालण्यासाठी कियाराच्या एन्ट्रीने होते. मात्र, अभिनेत्री लाजत नाही तर नाचत स्टेजवर पोहोचते. अशात दूर उभा असलेला सिद्धार्थ तिची वाट पाहत असताे. त्यानंतर दाेघे साेबत येतात आणि ऐकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर एकमेकांचे चुंबन घेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाचे कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी मेहेंदी सोहळा पार पडला. तर, दुस-या दिवशी पाहुण्यांसाठी खास लंचची व्यवस्था करण्यात आली होती, त्यानंतर रात्रीचे संगीत आयोजन करण्यात आले होते. यानंतर 7 फेब्रुवारीला आधी कियारा आणि सिडचा हळदीचा सोहळा झाला आणि नंतर सात फेरे घेत दोघेही लग्न बंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाला शाहिद कपूर, मीरा राजपूत, जुही चावला, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा ​​पोहोचले होते. याशिवाय अंबानी कुटुंबीयही त्यांच्या लग्नाला पोहोचले होते. ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल कियार आणि सिडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जैसलर येथे आले होते.(bollywood actress kiara advani sidharth malhotra wedding video actress share first video of her dreamy wedding in suryagarh fort of rajasthan)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा

मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात

हे देखील वाचा