Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड ‘बॉडी नाही सुक लाकूड…’, क्रिती सेननचा जिममधील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; युजर्सने केल्या भन्नाट कमेंट

‘बॉडी नाही सुक लाकूड…’, क्रिती सेननचा जिममधील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; युजर्सने केल्या भन्नाट कमेंट

आदिपुरुष‘ चित्रपटातील ‘सीता’ म्हणजेच अभिनेत्री क्रिती सेनन अभिनयासोबतच तिच्या परफेक्ट फिगरसाठीही खूप चर्चेत असते. खरं तर, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी क्रिती जीममध्ये तासनतास वर्कआउट करते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्यायामासह तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) हिने जिममध्ये तासनतास वर्कआउट करण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री खांबाला लटकून वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले,’Some Monday Motivation..’ चाहत्यांना क्रितीचा हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, काही तासांतच त्याला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

व्हिडिओ पाहून काही लोक अभिनेत्रीच्या मेहनतीचे कौतुक करत आहेत, तर काही जण तिला यासाठी ट्रोल करतानाही दिसत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘सीता तू काय करत आहेस?, तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आदिपुरुषानंतर याची गरज आहे’, अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘कसरतची गरज नाही. कारण तुमचे शरीर कोरडे लाकूड आहे..’ अशाप्रकारे युजर्स अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती सेननच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, क्रिती शेवटची प्रभास, सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने सीतीचे भूमिका साकारली हाेती. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही आणि चित्रपटातील सर्व सेलिब्रिटी सोशल मीडियावर ट्रोल झाले.(bollywood actress kriti sanon shared her workout video on social media going viral )

अधिक वाचा-
ग्रहण काही संपेना! अनेक वादांशी सामना केलेला आदिपुरुष सिनेमा यूटुबवर लीक, काही तासातच मिलियन व्ह्यूज
मलायकाने घातली 3 लाखांहून अधिक किमतीचा हुडी, व्हिडिओ पाहून युजर्स म्हणाले, ‘असा रेनकोट 500 रुपयांना…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा