Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी आणि बॉलिवूडमध्ये ‘धकधक गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ती आता चित्रपटात खूप कमी दिसते. पण या गोष्टीचा परिणाम तिच्या फॅन फॉलोविंगवर अजिबात झालेला दिसत नाही. आजही लाखो चाहते तिच्या अदांवर फिदा आहेत. माधुरी दीक्षित ही ५४ वर्षाची आहे, पण तिचा डान्स आणि हावभाव बघून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. सध्या ती डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’ मध्ये परीक्षण करत आहे. या मंचावर ती नेहमीच अनेकांच्या मागणीवर डान्स करत असते. सध्या तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘राधा कैसे ना जले’ या गाण्यात हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाचा खूप सुंदर असा स्लिव्हलेस ड्रेस घातला आहे. तसेच तिने गळ्यात अत्यंत आकर्षक नेकलेस घातला आहे. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १.७ मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा लूक ‘डान्स दीवाने ३’ मधील आहे.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक गाण्यांवर देखील डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा