Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड मलायकाचा अर्जुन कपूरसाेबतच्या नात्याबाबत माेठा खुलासा; म्हणाली, ‘मला एक सरप्राईज…’

मलायकाचा अर्जुन कपूरसाेबतच्या नात्याबाबत माेठा खुलासा; म्हणाली, ‘मला एक सरप्राईज…’

बाॅलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये मलायका अराेरा हिचा देखील समावेश आहे. मलायकाने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत एक अनाेखा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री तिच्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.  2017 मध्ये अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अशातच अभिनेत्री तिच्या दुस-या लग्नाबद्दल उघडपणे बोलली आहे. नेमकी काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

खरे तर, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मलायका अराेरा (malaika arora) पुन्हा लग्न करण्याबाबत बोलली आहे.आता ती पुनर्विवाहाचा विचार करत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले, परंतु सध्या यावर जास्त काही बोलू इच्छित नाही असे अभिनेत्रीचे म्हणणे हाेते. ती म्हणाली की, “मी नक्कीच याबद्दल विचार केला आहे, माझा प्रेमावर विश्वास आहे, परंतु मी पुन्हा लग्न कधी करणार आहे याचे उत्तर मी देऊ शकत नाही. कारण, मला सध्या काही गोष्टी सरप्राईज ठेवायच्या आहेत. सर्व काही आधिच सांगितले तर त्याची मजा संपेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “मी खूप लहान असताना मला कोणीतरी सांगितले होते की, नाते हे रोपासारखे असते, तुम्ही बी पेरता आणि ते वाढवण्यासाठी तुम्हाला पाणी द्यावे लागते, त्यामुळे कोणतेही नाते अश्याच प्रकारे असते, त्यात तुम्ही कोणत्याही प्रकरचा शॉर्टकटचा अवलंब करू शकत नाही. यामध्ये एकमेकांना समजून घेणे खूप महत्वाचे आहे, जे आपण विसरतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका आणि अर्जुन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीला अनेकदा एकत्रही पाहिले गेले आहे. यासोबतच ते त्यांचे सुंदर रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात, ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते. अशात हे जाेडपे लग्नबंधनात अडकतात की, नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(bollywood actress malaika arora with actor arjun kapoor actress said wants to do that)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुष्मिता सेनने पुन्हा पकडला एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शॉलचा हात? अभिनेत्रीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील “ती” चूक दिग्दर्शक ओम राऊतच्या अंगाशी! टीमच्या विरोधात तक्रार दाखल

हे देखील वाचा