Saturday, November 9, 2024
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या ५ व्या वर्षापासून केली होती अभिनयाला सुरुवात, साखरपुड्यानंतर २ वर्षांनी झाला होता होणाऱ्या पतीचा मृत्यू

‘या’ अभिनेत्रीने वयाच्या ५ व्या वर्षापासून केली होती अभिनयाला सुरुवात, साखरपुड्यानंतर २ वर्षांनी झाला होता होणाऱ्या पतीचा मृत्यू

बॉलिवूडमध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या सौंदर्यामुळे आणि आपल्या उत्त्तम अभिनयामुळे त्यांनी आपला एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला. त्यांनी सिनेजगतात एवढी उत्तम कामगिरी केली की, आजही त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र कायम आहे. आज आपण त्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. तसेच एकापेक्षा एक अशा चित्रपटांत काम केले होते. चला तर मग मंडळी आज आपण अभिनेत्री नंदा यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

ही कहाणी आहे नंदा कर्नाटकी यांची. त्या फक्त नंदा या नावानेच खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. अभिनेत्री नंदा यांचा जन्म ८ जानेवारी, १९३९ रोजी कोल्हापूर येथे होता. नंदा या त्यांच्या काळातील एक अतिशय सुंदर आणि हुशार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. नंदा यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी हे एक यशस्वी अभिनेते, आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून नंदा यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगायचा झाला, तर एक दिवस नंदा शाळेतून परत आल्या, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, ‘उद्या तयार राहा, चित्रपटासाठी तुमचे शूट आहे. यासाठी आपल्याला तुझे केस कापून घ्यावे लागतील.’ यावर नंदा म्हणाल्या की, ‘मी कोणतेही शूटिंग करणार नाही.’ पण नंतर नंदा यांच्या आईने त्यांना खूप समजवल्यावर त्या या शूटसाठी तयार झाल्या होत्या. शूटसाठी नंदा यांचे केस मुलासारखे छोटे छोटे कापले गेले होते. या चित्रपटाचे नाव होते ‘मंदिर.’

चित्रपटाचे दिग्दर्शक नंदांचे वडील होते, पण दुर्दैवाने नंदाच्या वडिलांचा हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे नकळतच घराची संपूर्ण जबाबदारी नंदा यांच्या खांद्यावर पडली होती. नाईलाजाने त्यावेळी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली होती.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी नंदा या मराठी चित्रपटातील चांगल्या नायिका झाल्या होत्या. त्यांनी रेडिओ आणि स्टेजवरही काम करण्यास सुरुवात केली. नंदाने केवळ मराठी चित्रपटातच नव्हे, तर गुजराती चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी सुमारे आठ गुजराती चित्रपटांत काम केले, आणि त्यानंतर नंदा यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘गुमनाम’ आणि ‘प्रेम रोग’ सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. राजेंद्र कुमारसोबत त्यांचा ‘धूल का फूल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने नंदा यांना खूप नाव कमावून दिले. नंदा यांनी जवळजवळ सर्वच चित्रपटात बहिणीची भूमिका साकारली होती.

वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर नंदा या दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या प्रेमात पडल्या होत्या. देसाई यांचेही नंदा यांच्यावर प्रेम होते, पण अत्यंत लाजाळू नंदा यांनी मनमोहन यांना कधीही आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली नाही. त्यांनी दुसर्‍याशीच लग्न केले होते. मनमोहनसुद्धा आपल्या विवाहित जीवनात व्यस्त झाले, परंतु त्यांच्या पत्नीचे काही काळानंतर निधन झाले. यानंतर मनमोहन पुन्हा नंदांच्या जवळ आले होते. त्यावेळी नंदा ५२ वर्षांच्या होत्या. १९९२ मध्ये नंदा यांनी मनमोहन यांच्याशी साखरपुडा केला, पण कदाचित नशिबात काहीतरी वेगळंच होतं. दोन वर्षांनी मनमोहन देसाई यांचा अपघातात मृत्यू झाला. दोघे कधीही एक होऊ शकले नाहीत. पुढे सन २०१४ मध्ये नंदा यांचेही निधन झाले.

नंदा यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले होते. त्यात ‘कुलदैवत’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘देव जागा आहे’, ‘देवघर’, ‘झाले गेले विसरून जा’ आणि ‘मातेविना बाळ’ या मराठी चित्रपटांचा समावेश होता. दुसरीकडे हिंदी चित्रपटांमध्ये ‘नया नशा’, ‘असलियत’, ‘जब जब फूल खिले’, ‘जुर्म और सजा’, ‘प्रयाश्चित’, ‘आँचल’ आणि ‘काला बझार’ यांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यांनी रातोरात प्रसिद्ध झालेल्या अरिजित सिंगचा वर्षभरात मोडला होता सुखी संसार, वाचा त्याची कहाणी

-‘तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरात…’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने मारली होती सुपरस्टार राजेश खन्ना यांना कानशिलात

-अभिनेत्यांवरुन अभिनेत्रींच्या पाच जोड्यांमध्ये झाले होते वाद, आजही पाहात नाही एकमेकांचे तोंड

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा