साऊथचा सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट आरआरआर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले. या वर्षी मार्चमध्ये, चित्रपटाच्या नाटू- नाटू या गाण्याने 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर देखील जिंकला. सामान्य लोक आणि स्टार्समध्ये अजूनही या गाण्याची क्रेझ आहे. अशात अलीकडेच आलिया भट्टची सासू आणि बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरने वयाच्या 64व्या वर्षी तिची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसोबत नाटू-नाटूवर डान्स केला, ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना दिग्गज अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या आवडत्या #neetukapoor सोबत #natunatu गाण्यावर डान्स.’ मंडळी, पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री ऋषी आणि नीतू कपूर यांची फॅन आहे. अभिनेते ऋषी कपूर गेल्यानंतर अभिनेत्री नीतू कपूर यांना अधून- मधून भेटत असते.
View this post on Instagram
अलीकडेच अंबानी इव्हेंटमध्ये आलिया भट्टही साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. याआधी हे गाणे झी सिनेमा अवॉर्ड्स 2023मध्येही सादर करण्यात आले होते. यादरम्यान आलिया गंगूबाई काठियावाडीच्या लूकमध्ये दिसली. तिने पांढरी साडी आणि केसांचा बन घातला होता. साडी नेसून आलिया भट्टने आयुष्मान खुरानासाेबत नाटू-नाटू गाण्यावर डान्स केला.
नीतू कपूर यांच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर गेल्या वर्षी नीतू कपूर ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसल्या हाेत्या. या चित्रपटात त्यांच्याशिवाय अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. (bollywood actress neetu kapoor danced with padmini kolhapure on rrr song naatu naatu video viral)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस
सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’










