Tuesday, July 9, 2024

कपूर कुटुंबातील ‘या’ चिमुकल्यांना ओळखा पाहू, आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स

बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. नीतूजी अनेकदा थ्रोबॅक फोटोंसह चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. अशातच आता त्यांनी पुन्हा एक जुना आणि न पाहिलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कपूर कुटुंबातील मुले एकत्र दिसत आहेत, जे आज बाॅलिवूडसे स्टार्स आहेत.

नीतू कपूर (neetu kapoor) यांनी मंगळवारी (4 जुलै)ला त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी सेक्शनमध्ये हा थ्रोबॅक फोटो शेअर केला. या फाेटाेमध्ये रणधीर कपूर- बबिता यांची मुले करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रितू नंदा यांची मुले निखिल नंदा, निताशा नंदा फोटोमध्ये दिसत आहेत. तसेच, छोटा रणबीर कपूर देखील फोटोचा एक भाग आहे, ज्याला ओळखणे खूप कठीण आहे. सगळे एकत्र बसून कॅमेऱ्यासमाेर पोज देत आहेत.

फोटो शेअर करताना नीतू कपूरने कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी अन् ‘क्यूटी’ असे लिहिले आहे. फाेटाेत डावीकडून सलवार कमीजमध्ये निताशा नंदा, निळ्या टी-शर्ट आणि डेनिम पॅंटमध्ये निखिल नंदा, स्ट्रीप टॉप आणि पॅन्टमध्ये करिश्मा कपूर आणि शेवटी करीना कपूर पांढऱ्या टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहेत. त्याच वेळी, मधला सर्वात लहान मुलगा रणबीर कपूर आहे, जो खूप गोंडस दिसत आहे.

bollywood stars
Photo Courtesy: Instagram/neetu54

रणबीर कपूर सध्या ‘अॅनिमल’ची तयारी करत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. अॅनिमलचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी करत आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. ‘अॅनिमल’मध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

दुसरीकडे, करीना कपूर लवकरच ‘द क्रू’मध्ये दिसणार आहे, ज्यात तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझ देखील आहेत, तर करिश्मा नियो- नॉयर ड्रामा ब्राउनसह परतणार आहे.(bollywood actress neetu kapoor shares ranbir kapoor kareena kapoor karisma kapoor childhood photo)

अधिक वाचा-

पद्मावतमधील अलाउद्दीन खिलजी भूमिकेसाठी रणवीर सिंग नाही तर ‘हा’ अभिनेता होता भन्साळी यांची पहिली पसंती
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

हे देखील वाचा