Tuesday, September 26, 2023

पद्मावतमधील अलाउद्दीन खिलजी भूमिकेसाठी रणवीर सिंग नाही तर ‘हा’ अभिनेता होता भन्साळी यांची पहिली पसंती

संजय लीला भन्साळी याच्या करियरमधील सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे ‘पद्मावत‘. 2018 साली आलेल्या या सिनेमाने अतिशय प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. सिनेमातील गाणी, संवाद, कलाकार, अभिनय, संगीत सर्वच बाबी तुफान गाजल्या. या सर्वांमध्ये एक गोष्ट आकर्षणाची ठरली आणि ती म्हणजे, रणवीर सिंगची भूमिका. अभिनेता रणवीर सिंगने या सिनेमात ‘अलाउद्दीन खिलजी’ ही नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याच्या करियरला एक मोठी उसळी, तर दिलीच सोबतच त्याच्यातल्या अभिनेत्याला एक वेगळी ओळख देखील मिळाली.

मात्र, खूप कमी लोकांना हे माहित असेल की, ‘अलाउद्दीन खिलजी’ या भूमिकेसाठी रणवीर सिंग हा भन्साळी यांची पहिली पसंती नव्हता. संजय लीला भन्साळी यांना या भूमिकेसाठी दुसऱ्या एका मोठ्या अभिनेत्याला घ्यायचे होते. मीडिया रिपोर्टनुसार भन्साळी यांनी जेव्हा ‘पद्मावत’ बनवण्याचे ठरवले तेव्हा त्यांना सिनेमातील सर्वात मोठा पावरफुल रोल अजय देवगणने करावा असे वाटत होते. मात्र दुर्दैवाने अजय तेव्हा दुसऱ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता आणि तारखांचा खूपच घोळ होत होता. म्हणूनच त्याने या सिनेमाला नकार दिला.

अजय देवगणने नकार दिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी या भूमिकेसाठी रणवीर सिंगला विचारणा केली आणि त्याने होकार दिला. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर या भूमिकेला अमर केले. सोबतच सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. दरम्यान ‘पद्मावत’ सिनेमाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शन करण्यात आली होती. काही संघटनांनी या सिनेमाला मोठा विरोध केला. आधी ‘पद्मावती’ नाव असलेल्या सिनेमाचे विरोधामुळे नंतर ‘पद्मावत’ नाव केले गेले होते.(ranveer singh is not first choice of allauldin khilji)

अधिक वाचा-

‘या’ कारणास्तव समंथाने सिनेसृष्टीतून घेतला ब्रेक, निर्मात्यांचा अॅडव्हान्सही केला परत
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

हे देखील वाचा