Wednesday, July 3, 2024

प्रेमात दगा, भावाच्या मित्रासोबत प्रेम, लग्न न करता गरोदर, अशी ‘परदेस’ सिनेमाच्या ‘गंगा’ची दुःखद कहाणी

घर, पती आणि मुलांची जबाबदारी पार पाडत स्वत:चे नाव कमवण्यासाठी स्त्री खूप काही करते. तिला आयुष्यात खूप काही सहन करावे लागते. प्रेमात फसवणूक झाल्यावर तिचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे बनते. असेच काहीसे ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरीसोबत घडले. मात्र ती या कठीण प्रसंगांना मोठ्या संयमाने सामोरे गेली. चला तर जाणून घेऊ या तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी…

परदेस हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हिट तर झालाच पण या चित्रपटातील गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान याने अर्जुन ही भूमिका साकारली होती. ‘गंगा’ ही भूमिका महिमा चौधरी (Actress Mahima Chaudhary) हिने साकारली होती. गंगा म्हणजेच महिमा या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यामुळे ती खुप चर्चेत आली होती. पण महिमाचे वैयक्तिक जीवन तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आले. पण प्रेमाच्या बाबतीत ती अनलकी ठरली. तिच्या वैयक्तिक जीवनाचा तिच्या करियरवर प्रभाव पडला.

‘परदेस’ चित्रपटातून शानदार पदार्पण केल्यानंतरही ती बॉलिवूडमध्ये जास्त काळ काम करू शकली नाही. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर या अभिनेत्रीने आधी भावाच्या मित्रासोबत नात्यात होती, पण तिथेही तिला दुःखाचा सामना करावा लागला. या अभिनेत्रीने आपल्या मुलीला एकट्याने वाढवले ​​आणि आता ती स्वतःच्या बळावर आयुष्यात पुढे जात आहे.

‘परदेस’ चित्रपटातून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर असा प्रभाव सोडला होता की आजही लोक तिची आठवण काढतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. महिमा चौधरी जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा ती स्टार टेनिसपटू लिएंडर पेसच्या प्रेमात पडली होती. ती जीवनात खरा जोडीदार शोधत होती. तो जोडीदार ती लिएंडर पेसमध्ये शोधत होता. लिएंडर खेळत असताना महिमा अनेकदा त्याला बेंचवर बसून पाहत असे.

महिमा आणि लिएंडरमध्ये जवळपास 3 वर्षे सर्व काही सुरळीत चालले होते, त्यानंतर 2003 मध्ये, मॉडेल रिया पिल्लईसोबत टेनिसपटूच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. जी त्यावेळी अभिनेता संजय दत्तची पत्नी होती. एके दिवशी महिमाने लिएंडरला रियाशी बोलताना रंगेहात पकडले. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, या घटनेनंतर तिने लगेचच लिएंडरसोबत ब्रेकअप केले.

त्यानंतर 2006 मध्ये महिमा पुन्हा कोलकातामध्ये राहणाऱ्या आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याला भेटली. अभिनेत्रीच्या भावाचे तो जवळचा मित्र असल्याने ते दोघे अनेकदा कार्यक्रमांमध्ये भेटत असत. दोघे प्रेमात पडले. 19 मार्च 2006 मध्ये लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी लग्न केले. जेव्हा पापाराझींनी अभिनेत्रीचा बेबी बंप पाहिला तेव्हा तिला बॉबीसोबतच्या गुप्त लग्नाबद्दल सांगावे लागले. ही अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, त्यामुळे तिने घाईघाईत लग्न केले आणि प्रेग्नेंसीबद्दल सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

 

महिमाने 2007 मध्ये एका मुलीला जन्म दिला. जेव्हा बॉबीच्या पूर्व पत्नीसोबतचे कायदेशीर वाद समोर आले. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. बॉबी आणि महिमा यांच्यातील अंतर  वाढत गेले. 2013 मध्ये ते दोघे वेगळे झाले. ते वेगळे झाले, जरी त्यांचा घटस्फोट झाला नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की नात्यातील समन्वयाचा अभाव हे त्यांच्या विभक्त होण्याचे कारण आहे. 49 वर्षीय अभिनेत्रीने 15 वर्षांची मुलगी आरियाना चौधरी हिला सिंगल मदर म्हणून तिचा सांभाळ करत आहे. (bollywood actress pardes movie fem mahima chaudhary sad love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच
घटस्फोटानंतर पतीनं दुसरा संसार थाटला, पण सिंगल मदर बनून बॉलिवूडच्या या अभिनेत्री करतायेत मुलांचा सांभाळ, पाहा कोण कोण यादीत

हे देखील वाचा