बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत रेस्टॉरंटबाहेर दिसल्यापासून माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चाही प्रचंड सुरू झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर चर्चा आता लग्नापर्यंत पोहोचली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकलेल्या परिणीती आणि राघव यांच्यात काय सुरू आहे हे फक्त त्यांनाच माहीत आहे. मात्र, या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशात काल रात्री म्हणजेच रविवारी (दि. 27 मार्च)अभिनेत्री स्पाॅट झाली, ज्यावेळ पुन्हा एकदा पॅपराझींने अभिनेत्रीला राघव चड्ढा यांच्या नावने छेडले.
खरे तर, परिणीती चोप्रा (parineeti chopra) प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली होती. व्हिडिओमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. मात्र, यावेळी परिणीती तिच्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नव्हती. कधी ती तिच्या ड्रेसला खाली खेचत हाेती, तर कधी पोटावर हात ठेवताना दिसत होती. अशात आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक विचार घुमू लागले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत युजर्सने अभिनेत्रीला ट्राेल केले आहे.
परिणीती चोप्राचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘मला आशा आहे की, ड्रेस गुलाबी रंगाचा नसेल.’, तर एक युजर म्हणाला, ‘चढ्ढाला भेटायला जात आहे?’, अशात अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीला लवकरच लग्न करण्यास सांगितले.
View this post on Instagram
अलीकडेच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या कुटुंबात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्याची बातमी माध्यमानी दिली होती. एवढेच नाही, तर हे दोघे एकमेकांना पसंत करतात असेही एका सूत्राने सांगितले. लवकरच यासंदर्भात ऑफिशियल अनाउंसमेंट देखील केली जाईल. यासोबतच एक सेरेमनीही होणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे कुटुंबीयच सहभागी होणार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की, हे दोघे फक्त मित्र आहेत. प्रेमाचा काेणताही चक्कर नाही. अशात येणार वेळच सांगेल की, खरं काय आहे. (bollywood actress parineeti chopra spotted manish malhotra house without raghav chadha netizens adviced her about wedding outfit)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छत्रपती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, ‘या’ साऊथ अभिनेत्याच्या एंट्रीने उडाली खळबळ
‘मुझे इश्क़ है…’, प्राजक्ता माळीची ‘ती’ पाेस्ट चर्चेत, फाेटाे व्हायरल