साऊथ सिनेसृष्टी सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक जेवढी प्रतीक्षा बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी करतात, तेवढीच ते दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठीही करत आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही कलाकारही बाॅलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात आता तेलगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवासही हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळत असल्याची बातमी आहे. बेल्लमकोंडा साईचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. अशात त्याने एक ट्विट करुन चांगलीच धुमाकूळ घातली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
खरे तर, टॉलिवूड अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास (bellamkonda sreenivas) आता हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता एसएस राजामौली यांच्या हिट तेलुगू चित्रपट ‘छत्रपती’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित ‘छत्रपती’ हा तेलुगू चित्रपट, एक तरुण शिवाजी आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे. शिवाच्या कुटुंबाला श्रीलंकेतील त्यांच्या समुदायापासून वेगळे केले जाते आणि विशाखापट्टणममध्ये मजुर कामगार म्हणून ठेवले जाते. मग शिव अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.
The wait is over #Chatrapathi in cinemas on 12th May, 2023. Cannot wait to show you all our hardwork & this action-packed dhamaka.????
Written by the one and only #VijayendraPrasad, directed by #VVVinayak.@Penmovies #Bss9 pic.twitter.com/VSLYTWQkrT— Bellamkonda Sreenivas (@BSaiSreenivas) March 27, 2023
विशेष म्हणजे ‘छत्रपती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. विनायक करत आहेत. विनायक यांनी अनेक साऊथ हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘छत्रपती’चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरसोबतच प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही माहिती देण्यात आली आहे.
अलीकडेच अभिनेता बेल्लमकोंडा याने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फाेटाे शेअर केला आणि लिहिले की, ’12 मे 2023 रोजी ‘छत्रपती’ चित्रपट सिनेमागृहात येत आहेत. माझी सर्व मेहनत आणि अभिनय मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.’ (chatrapathi first poster release actor bellamkonda sreenivas debut in hindi cinema )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! ‘आकांक्षा दुबेची हत्याच’, धक्कादायक माहिती समोर
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण