Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड पिंकी इराणीचा धक्कादायक खुलासा! अभिनेत्रींची सुकेशसाेबत ओळख करून देण्यासाठी करायची ‘हे’ प्रयत्न

पिंकी इराणीचा धक्कादायक खुलासा! अभिनेत्रींची सुकेशसाेबत ओळख करून देण्यासाठी करायची ‘हे’ प्रयत्न

सुकेश चंद्रशेखर याची सहकारी पिंकी इराणी हिला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 21 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पिंकी इराणीनेच सुकेशची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसशी ओळख करून दिली. तिच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान पिंकीने खुलासा केला की, ती अभिनेत्रींशी ओळख करून देण्यासाठी प्रोटोकॉलचे उल्लंघन करत सुकेशपर्यंत पोहोचायची.

दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पिंकी इराणी (pinky irani) हिला 30 नोव्हेंबर रोजी अटक केली, जिथे न्यायालयाने तिला चौकशीसाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यादरम्यान, EOW ने पिंकीची चौकशी करून तिला तिहारला नेले आणि सीन रिक्रिएशन केलं, जेणेकरून ती अभिनेत्रींना तिहारला नेण्यात कशी यशस्वी झाली हे सांगू शकेल.

माध्यमातील वृत्तानुसार, पिंकी इराणी हिने खुलासा केला की, “तुरुंगातील एक कर्मचारी प्रवेशद्वारावर भेटत असे आणि त्यांना जेल ब्लॉकजवळील कार्यालयासारख्या इमारतीत घेऊन जात असे. सुकेशने या तात्पुरत्या कार्यालयाचा वापर त्याच्या पाहुण्यांसाठी केला. यावेळी ना ओळखपत्र तपासले गेले, ना एंट्री झाली.

पिंकी इराणी हिचा कबूल जवाब नोंदवण्यात आलं असून, ते दिल्ली तुरुंगातील भ्रष्टाचारासंदर्भातील तपासात अधिक उपयुक्त ठरणार आहे. सुमारे 80 तुरुंग कर्मचारी आणि अधिकारी आधीच रडारवर आहेत. मात्र, पिंकी या अभिनेत्रींना सुकेशशिवाय इतर कोणाला भेटण्यासाठी आत घेऊन जात होती का, हे अद्याप चौकशीत समोर आलेले नाही. पिंकी इराणी सध्या 21 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला सांगितले होते की, पिंकी इराणीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती आणि खंडणीच्या पैशाच्या वितरणातही तिचा हात होता. (bollywood actress pinky irani reveals how she used to flout all rules and protocols to take actresses meeting for sukesh chandrshekhar)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीनं व्यक्त केलं एकमेकांवरचं प्रेम; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या प्रकाशाचा किरण…’

‘देख रहा है ना बिनोद, ब्रॅंड मिळणे बंद झाले का?’, आमिर खान पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

हे देखील वाचा