क्या बात है! ८५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पाण्यात केले एरोबिक्स, तरुणाईलाही लाजवेल त्यांचा ‘हा’ उत्साह

He Man Dharmendra Post His Video Doing Water Aerobics On International Yoga Day


बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले आणि आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि ऍक्शनने चाहत्यांमध्ये एक वेगळीच ओळख मिळवली. त्यातीलच एक अभिनेते म्हणजेच ‘धर्मेंद्र’ होय. धर्मेंद्र हे आपल्या जबरदस्त ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखले जायचे आणि जातात. कदाचित त्यामुळेच त्यांना ६० च्या दशकात ‘ही मॅन’ म्हणून ओळखले जात होते. तरीही त्यांना आजही या नावाने बोलावले, तर चुकीचे ठरणार नाही. ८५ वर्षीय धर्मेंद्र सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. नेहमीच ते आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, त्यातून ते खरंच ऍक्शन हिरो असल्याचा पुरावा देत आहेत.

हा व्हिडिओ धर्मेंद्र यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडत आहे. खरं तर हा व्हिडिओ त्यांनी ‘जागतिक योगा दिना’निमित्त शेअर केला आहे. या व्हिडिओत ते पाण्यामध्ये एरोबिक्स करताना दिसत आहेत. वयाच्या ८५ वर्षी त्यांचा हा उत्साह तरुणाईलाही लाजवणारा आहे.

हा व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले की, “मित्रांनो… आज जागतिक योगा दिनानिमित्त उत्साहित आहे. मी आज रात्रीपासून वॉटर एरोबिक्स सुरू केले आहे. पाण्याच्या लाटांमध्ये एरोबिक्स करण्याची आपली एक वेगळीच मजा आहे. अपेक्षा करतो की, तुम्हाला हे आवडेल.”

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वीही धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते एरोबिक्स करताना दिसत होते. चाहत्यांनी या व्हिडिओलाही भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यांच्या व्हिडिओने प्रेरित होऊन दोन तरुणांनी थेट ट्रॅक्टरमध्ये स्विमिंग पूल बनवले होते.

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते ‘अपने २’ या चित्रपटात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेन विल बी मेन!’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम निखिल राऊतच्या मजेदार व्हिडिओची इंटरनेटवर धमाल

-खेसारी लाल यादवने नवीन गाण्यात केला दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स; २४ तासात मिळाले ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-पोट धरून हसायचंय?, तर जान्हवीचा हा व्हिडिओ एकदा पाहाच; हातात चप्पल घेऊन लावलेत ठुमके


Leave A Reply

Your email address will not be published.